Best Selling 7 Seater: ज्या लोकांचे कुटुंब ५ ते ७ लोकांचे आहे त्यांना मोठी ७ सीटर कारच अधिक कम्फरटेबल असते. हॅचबॅक आणि SUV कार व्यतिरिक्त, ७-सीटर वाहने भारतीय बाजारपेठेत चांगली विकली जातात. जून महिन्यातील कार विक्रीच्या आकड्यांबद्दल बोलायचे झाल्यास, मारुती वॅगनआर ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. त्याचवेळी, सर्वात जास्त विक्री होणारी SUV Hyundai Creta ही आहे आणि सर्वात जास्त विक्री होणारी MPV ही मारुती एर्टिगा आहे पण आणखी एका MPV ने एर्टिगासाठी समस्या निर्माण केली आहे. चला तर पाहूया कोणती आहे ही सात सीटर कार…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आम्ही ज्या कारबद्दल बोलत आहोत ती म्हणजे Kia Carens. विक्रीच्या बाबतीत, ते Ertiga पेक्षा किरकोळ मागे आहे. मारुती एर्टिगा जून महिन्यात एकूण कार विक्रीमध्ये १५ व्या स्थानावर आहे. गेल्या महिन्यात या कारने एकूण ८,४२२ युनिट्सची विक्री केली होती तर एक वर्षापूर्वी याच महिन्यात म्हणजेच जून २०२२ मध्ये एर्टिगाच्या १०,४२३ युनिट्सची विक्री झाली होती. त्यानुसार त्याच्या विक्रीत १९ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.

(हे ही वाचा : TVS Raider चा खेळ संपणार? Hero देशात आणतेय दमदार मायलेज अन् स्टायलिश लूकसह नवी बाईक, फीचर्स तर…)

Kia Carens ची वाढली विक्री

दुसरीकडे, Kia Carens बद्दल बोलायचे झाले तर, ही एकूण कार विक्री अठराव्या स्थानावर आहे. गेल्या महिन्यात, एकूण ८,०४७ युनिट्सची विक्री झाली आहे तर एक वर्षापूर्वी याच महिन्यात म्हणजेच जून २०२२ मध्ये, कॅरेन्सच्या ७,८९५ युनिट्सची विक्री झाली होती. अशा प्रकारे, त्याच्या विक्रीत १ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मात्र, एमपीव्ही विक्रीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. टोयोटा इनोव्हा याच्या वर दुसऱ्या क्रमांकावर आहे. आCarens ची किंमत १०.२० लाख रुपयांपासून सुरू होते.

एमपीव्ही सेगमेंटमध्ये Ertiga ची सर्वाधिक विक्री होत असली तरी बाजारात स्पर्धा वाढत आहे. Kia Carens गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लाँच झाल्यापासून ते मोठ्या प्रमाणात विकले जात आहे. ही कार थेट एर्टिगाला टक्कर देते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In jun 2023 the total sales figure of kia cars was 19391 units this included sales of carens 8047 pdb