गेल्या काही दिवसांपासून भारतीय वाहनांच्या बातम्या वाचून ग्राहकांच्या चेहऱ्यावर फारसा आनंद नाहीये आणि याचे कारण म्हणजे गाड्यांच्या किमतींमध्ये होणारी वाढ. गाड्यांच्या भाववाढीमध्ये मारुती सुझुकी, ह्युंदाई, फोक्सवॅगन, जीप, होंडा, महिंद्रा, टाटा, स्कोडा यांसारख्या कंपन्यांसोबतच; मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी यांसारख्या लग्झरी कंपन्यांनीदेखील आपला नंबर लावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या गाड्यांची भाववाढ नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच म्हणजेच १ जानेवारी २०२४ पासून होणार असल्याचे समजत असून, त्यांच्या नवीन किमती काय असतील हे ओईएमने [OEM] सांगितले आहे, असे हिंदुस्थान टाइम्सच्या एका लेखातून समजते.

२०२४ मध्ये गाड्यांच्या किमतींमधील होणारे बदल

१. मारुती सुझुकी

भारतातील सर्वात मोठ्या कार उत्पादन कंपनीने १ जानेवारी २०२४ पासून आपल्या गाड्यांच्या किमती वाढणार असल्याचे सांगितले आहे. मारुती सुझुकीची चालू आर्थिक वर्षातील ही दुसरी भाववाढ असणार आहे. याआधी साधारण एप्रिल २०२३ या महिन्यामध्ये, सर्व मॉडेल्सच्या किमती ०.८ टक्क्यांनी वाढवल्या होता. परंतु, नवीन भाववाढीमध्ये कोणत्या मॉडेल्सची भाववाढ होणार आहे हे मात्र अजून समजलेले नाही. सर्व कच्च्या मालावरील होणाऱ्या भाववाढीमुळे गाड्यांच्या किमती वाढवणे भाग असल्याचे कार निर्मात्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : फोन, लॅपटॉप किती वेगाने चार्ज होतोय हे ‘या’ केबलवरून समजणार; पाहा काय आहे याची किंमत आणि खासियत….

२. ह्युंदाई

ह्युंदाईदेखील येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपल्या गाड्यांची किंमत वाढवणार असून, त्यांचे कारणदेखील वाढती भाववाढ हेच आहे. दक्षिण कोरियाची ही कंपनी भारतामध्ये ५.८४ लाख ते ४५.९५ लाखांदरम्यान गाड्या विकत असली, तरीही पुढच्यावर्षी नेमकी किती भाववाढ करणार आहेत, याबद्दल अजून काही सांगितलेले नाही.’

३. होंडा

जपानी बनावटीच्या होंडा गाड्यादेखील पुढच्या वर्षीपासून अधिक महाग होणार असल्याचे समजते. कोणत्या मॉडेलची किती भाववाढ होणार आहे, हे या महिन्याच्या शेवटापर्यंत ठरवले जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

४. टाटा मोटर्स

टाटा मोटारसुद्धा आपल्या सर्व गाड्यांच्या किंमती वाढवणार आहेत. यामध्ये १ जानेवारी २०२४ पासून इलेक्ट्रिक गाड्यांचासुद्धा समावेश करण्यात येणार आहे. परंतु, अजूनही किमतींमध्ये किती वाढ होणार आहे हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

५. महिंद्रा

महिंद्राच्या SUV गाड्यांच्या किमतीत पुढच्या महिन्यापासून वाढ होणार असल्याचे समजते. वाढत्या महागाईमुळे, कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे गाड्यांचे भाव वाढवण्याची गरज असल्याचे मत महिंद्राचे SUV विशेषतज्ज्ञ मांडतात. परंतु, अद्यापही कोणत्या मॉडेलवर किती रुपयांची भाववाढ होणार आहे हे मात्र समजले नाही.

हेही वाचा : व्हॉट्सॲपवरील महत्त्वाचे चॅट्स कसे ठेवाल डोळ्यांसमोर? जाणून घ्या मेटाने आणलेल्या ‘या’ नव्या फीचरबद्दल….

६. फोक्सवॅगन

जर्मन बनावटीच्या फोक्सवॅगनच्या गाड्यांची किंमत १ जानेवारी २०२४ पासून, दोन टक्क्यांनी वाढणार असल्याचे समजते.

७. स्कोडा

स्कोडानेदेखली आपल्या स्लाव्हिया, कुशक आणि कोडीक यांसारख्या गाड्यांची १ जानेवारी २०२४ या नवीन वर्षापासून भाववाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

८. बीएमडब्ल्यू

बीएमडब्ल्यू हीदेखील एक जर्मन बनावटीची गाडी असून, पुढच्या वर्षापासून याच्या किमतींमध्ये दोन टक्क्यांनी वाढ होणार आहे. बीएमडब्ल्यूच्या सर्व गाड्यांची भाववाढ होणार असून यामध्ये नव्या बीएमडब्ल्यू आय ७ चादेखील समावेश आहे. बीएमडब्ल्यू सध्या भारतामध्ये इव्ही गाड्यांसोबत एकूण २१ मॉडेल्सची विक्री करते.

९. ऑडी

इतर लग्झरी गाड्यांप्रमाणे ऑडीनेदेखील गाड्यांचे भाव वाढवण्याची घोषणा केली आहे. भारतामध्ये ऑडी एकूण १५ मॉडेल्सची विक्री करत असून यामध्ये चार इव्ही गाड्यांचादेखील समावेश आहे. यापैकी ऑडी A४ [४३.८५ लाख रुपये] ही सर्वाधिक परवडणारी गाडी असून, ऑडी RSQ८ [२.२२ करोड रुपये] ही सर्वात महागडी गाडी असल्याचे समजते.

१०. जीप

जीप कंपनीच्या जीप कंपास आणि जीप मेरेडियन या दोन्ही गाड्या येत्या वर्षापासून दोन टक्क्यांनी महागणार आहेत.

११ मर्सिडीज बेंझ

मर्सिडीज बेंझ ही लग्झरी गाडीची कंपनीदेखील भारतातील काही मॉडेल्सची किंमत दोन टक्क्यांनी वाढवणार आहे. C क्लास गाडी ही पुढच्या महिन्यापासून ६० हजार रुपयांनी महागणार आहे. GLS ग्लास ही साधारण २.६ लाखांनी महाग होणार असून, Maybach S ६८० या टॉप एन्ड इंपोर्टेड गाडीसाठी ३.४ लाख रुपये अधिक ग्राहकांना मोजावे लागणार असल्याचे कार निर्मात्यांनी म्हटले आहे, अशी माहिती हिंदुस्थान टाईम्सच्या एका लेखावरून समजते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: January 2024 from honda to mercedes benz most of the cars in india will be costlier check out the list dha