Jeep Grand Cherokee booking : आलिशान फीचर आणि अद्ययावत सुरक्षा तंत्रज्ञानानेयुक्त JEEP GRAND CHEROKEE ही एसयूव्ही १७ नोव्हेंबरला भारतात लाँच होणार आहे. या एसयूव्हीबाबत कार चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. या एसयूव्हीची बुकिंग सुरू झाली आहे. आधी ही एसयूव्ही ११ नोव्हेंबर रोजी लाँच होणार होती. मात्र तारीख बदलण्यात आली. त्यामुळे चाहत्यांना लाँचसाठी अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.

देशातच असेंबली

जीप कंपनीने रांजणगाव येथील आपल्या कारखाण्यात जीप ग्रँड चिरोकीची असेंबलिंग सुरू केली आहे. या कारखाण्यात असेंबल होणारे हे जीपचे चौथे वाहन आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस या एसयूव्हीची डिलिव्हरी सुरू होण्याची अपेक्षा आहे.

डिजाईन, फीचर

ग्रँड चिरोकी ही विदेशात दोन व्हेरिएंटमध्ये विकली जाते. मात्र भारतात याचे केवळ स्टँडर्ड ५ सीटर व्हर्जन मिळणार आहे, बसण्यासाठी तीन पंक्त्यांमध्ये सीट असलेली ग्रँड चिरोकी एल मिळणार नाही. एसयूव्हीच्या मध्यभागी १०.१ इंच टचस्क्रिन मिळेल आणि पूर्णत: डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळेल. पुढील प्रवाशासाठी देखील १०.२५ इंचचा टचस्क्रीन मिळत आहे.

हे आहेत सुरक्षा फीचर्स

चिरोकी कोलिजन वॉर्निंग, इमरजेन्सी ब्रेकिंग आणि अपडाप्टिव्ह क्रुज कंट्रोल अशा एडीएएस तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. चिरोकेमध्ये तुम्हाला पॅनोरॉमिक सनरूफ आणि प्रिमियम लेदर अपहोलेस्टेरी देखील मिळत आहे.

वाहनात मिळणार हे इंजिन

शेवटच्या पिढीतील ग्रँड चिरोकी भारतात पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनसह ऑफर करण्यात आली होती, मात्र चिरोकीच्या या नव्या मॉडेलमध्ये सिंगल २.० लिटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळेल. हे इंजिन ८ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्स्मिशनशी जोडलेले असेल. परंतु, इंजिनद्वारे किती शक्ती निर्माण होईल, याची माहिती जीपने सांगितलेली नाही. एसयूव्हीमध्ये क्वाड्रा ट्रॅक आय ४x४ सिस्टिम मिळते. त्याचबरोबर, टेरेन मोड्स देखील मिळतात.

काय असेल किंमत?

सुत्रांनुसार नवीन ग्रँड चिरोकीची किंमत ८५ लाख असेल. लाँच झाल्यावर ही एसयूव्ही मर्सडिज बेन्झ जीएलई आणि बीएमडब्ल्यू एक्स ५ ला टक्कर देईल.