भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये मारुती सुझुकी कारची क्रेझ आहे. या कार लोकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरत आहेत. देशातील सर्वात मोठी कार विकणारी कंपनी असलेल्या मारुती सुझुकीची अशी एक कार आहे जी वीस वर्षांपासून सातत्याने भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये आपले स्थान निर्माण करत आहे. आजही लोक या कारला फॅमिली कार म्हणून पहिली पसंती देतात.
मारुतीची ही हॅचबॅक १.०L आणि १.२L पेट्रोल इंजिनसह येते. या कारची किंमत ५.५५ लाख ते ७.२० लाख (सर्व, एक्स-शोरूम) दरम्यान आहे. हे CNG (१.०L) मध्ये ३४.०५kmpl आणि पेट्रोल AGS (१.०L) मध्ये २५.१९kmpl मायलेज देते.
(हे ही वाचा: अदानी, अंबानी नव्हे तर ‘या’ एकमेव भारतीयाकडे आहे २१ कोटींची सुपरकार, बुलेटच्या स्पीडलाही टाकते मागे!)
‘या’ कारवर तगडा डिस्काउंट
खरंतर आज आम्ही या कारबद्दल बोलत आहोत कारण कंपनी त्यावर खूप डिस्काउंट देत आहे. ५.५५ लाख रुपयांच्या एक्स-शोरूमपासून सुरू होणारी,ही कार वॅगन आर आहे. आता कंपनी WagonR वर मोठा डिस्काउंट देत आहे.
सवलत किती आहे?
मारुती सुझुकी जुलैसाठी Wagon R वर ५०,००० रुपयांपर्यंत सूट देत आहे. कारच्या मॅन्युअल आणि CNG प्रकारांवर २५,००० रुपयांची रोख सवलत, २० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ४,००० रुपयांची कॉर्पोरेट सूट उपलब्ध आहे.
दुसरीकडे, कंपनी कारच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटवर १५,००० रुपयांची रोख सवलत, २०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ४,००० रुपयांची कॉर्पोरेट सूट देत आहे. बॉक्सचा पर्याय मिळतो.