चांद्रयान-३ चे ‘विक्रम’ लँडर १४ जुलैला पृथ्वीच्या पृष्ठभागावरून झेपावलं होतं. यानंतर २३ ऑगस्टला ‘विक्रम’ लँडर अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरत भारताने नवा इतिहास घडवला आहे. भारतीय अंतराळ संस्थेने (इस्रो) जाहीर केलेल्या वेळेनुसार २३ ऑगस्टला सहा वाजून चार मिनिटांनी चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. आता ‘विक्रम’ लँडरमधून ‘प्रज्ञान’ रोव्हर बाहेर पडला असून, ‘इस्रो’नं त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. भारताच्या अंतराळ मोहिमांमधील एक अतिशयमहत्वाची मोहीम यशस्वी झाल्यानिमित्त लेक्ट्रिक्स ईव्ही कंपनीने एक स्पेशल-एडिशन ईव्ही स्कूटर लॉन्च केली आहे.
लेक्ट्रिक्स ईव्ही एक स्पेशल-एडिशन अशी ‘LXS Moonshine’ ईव्ही स्कूटर लॉन्च केली आहे. स्पेशल एडिशन स्कूटरची काही मर्यादित युनिट्सच बाजारात लॉन्च केली जाणार आहेत. चांद्रयान-३ च्या लॉन्चिंगवेळीच ‘LXS Moonshine’ चे काउंटडाऊन सुरू करण्यात आला होता. जेव्हा ‘विक्रम’ लँडरने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले त्याचवेळी लेट्रिक्स कंपनीने Moonshine स्कूटर लॉन्च केली. अंतराळ क्षेत्रात भारत वेगाने प्रगती करत आहे. त्याचे प्रतीक म्हणून लेट्रीक्स मूनशाइनवर दोन बाणांचे सोनेरी चिन्ह लावण्यात आले आहे. हे ‘स्पेस एज’ चिन्ह खरेतर लेक्ट्रिक्सच्या ब्रँड लोगोमध्ये बदल करून तयार करण्यात आले आहे.
स्पेशल एडिशन लॉन्चबद्दल लेक्ट्रिक्स ईव्हीचे एमडी आणि सीईओ श्री. के विजय कुमार यांनी सांगितले, “आजच्या भारतीय जेन झेडच्या महत्त्वाकांक्षांना आकाश देखील अपुरे पडेल. त्यांची स्वप्ने चंद्राकडे झेपावत आहेत. महत्त्वाकांक्षांचे बळ आणि सुयोग्य तंत्रज्ञान हाताशी असेल तर तुम्ही किती दूरवर मजल मारू शकता हे भारताच्या चांद्रयान- ३ मोहिमेने दाखवून दिले आहे. लेक्ट्रिक्समध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांची व्यक्तिगत उद्दिष्ट्ये निश्चित करून ती पूर्ण रण्यासाठी प्रयत्नशील राहण्यासाठी प्रोत्साहित करतो. मूनशाईनबद्दल मला स्वतःला खूप उत्सुकता आहे. हे करत असताना आमच्या मनात भारताच्या अंतराळ युगातील कामगिरीबद्दल ठाम विश्वास आहे. प्रत्येकाने हा ऐतिहासिक क्षण लक्षात ठेवावा आणि त्याचा आनंद साजरा करावा यासाठी हे केले जात आहे.”
ईएफजीएच ब्रँड इनोव्हेशन्सचे संस्थापक आणि क्रिएटिव्ह चेअरमन श्री इमॅन्युएल उप्पूतुरू यांनी सांगितले, “ही काही मार्केटिंगपुरती करण्यात आलेली आणखी एक सोशल पोस्ट नाही. ग्राहकांना ज्याविषयी खूप अभिमान वाटेल असे प्रॉडक्ट लॉन्च करून हा महत्त्वाचा क्षण साजरा करण्याची संधी प्रदान करण्यासाठी आम्ही हे करत आहोत. म्हणूनच आम्ही एलएक्सएस मूनशाईनसाठी एक विशेष लूक तयार केला आहे, ज्यामध्ये एक विशेष बॅज देखील आहे. एलएक्सएसची राईड हा जणू अभिमानास्पद पदक मिळवल्यासारखा अनुभव आहे.”