scorecardresearch

चांद्रयान ३

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organization) – लघुस्वरुपात ‘इस्रो’ (ISRO) ही भारतातील प्रमुख शासकीय संस्था आहे. या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट अंतराळ संशोधन करणे हे आहे. या संस्थेद्वारे अंतराळाशी संबंधित अनेक प्रकल्प राबवले जातात. यामध्ये चांद्रायन, मंगळयान तसेच आदित्य एल-१ प्रकल्प, गगनयान प्रकल्प यांसारख्या काही प्रकल्पांचा समावेश होतो. इस्रोने काही महिन्यापूर्वी चांद्रयान ३ (chandrayaan 3)हे अवकाश यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाठवले. चंद्राच्या या भागावर अंतराळयान पाठवणारा भारत हा पहिला आणि एकमेव देश आहे. २००८ मध्ये भारताने पहिल्यांदा चंद्रावर स्वारी केली. तेव्हा चांद्रयान १ हे चंद्राच्या जवळ पाठवण्याच्या प्रयत्नांना भारताला यश मिळाले. पुढे चांद्रायन २ या मोहिमेला सुरुवात झाली.

२०१९ मध्ये तांत्रिक बिघाडामुळे शेवटच्या क्षणी चांद्रायन २ मोहीम अयशस्वी ठरली. २२ जुलै २०१९ रोजी प्रक्षेपित करण्यात आलेल्या या अंतराळयानाचे लॅंडर आणि रोव्हर चंद्रावर पोहचण्याआधीच क्रॅश झाले. या घटनेमुळे खचून न जाता इस्रोमधील वैज्ञानिकांनी चांद्रयान ३ प्रकल्पाची तयारी करायला सुरुवात केली. इतर संशोधन संस्था आपल्या अंतराळ संशोधनामध्ये बक्कळ पैसे करत असताना इस्रोने दिलेल्या बजेटमध्ये चांद्रयान ३ मोहिमेची पूर्वतयारी पूर्ण केली. १४ जुलै २०२३ रोजी दुपारी २.३५ वाजता चांद्रयान ३ चे श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण करण्यात आले.

या यानामध्ये विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान नावाच्या रोव्हरचा समावेश करण्यात आला होता. हे लॅंडर आणि रोव्हर अपयशी ठरलेल्या चांद्रयान २ मध्येही होते. चंद्रावर उतरताना झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न चांद्रयान ३ मध्ये केला होता. १४ जुलै रोजी भारतातून प्रक्षेपित झालेले चांद्रयान ३ हे अवकाशयान २३ ऑगस्ट २०२३ रोजी यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवले. चांद्रायन ३ मोहीम फत्ते झाल्याने भारताचे अंतराळ संशोधनात मोठे नाव झाले.
Read More
Aditya-L1 captures Sun Photo
Aditya L1 चं मोठं यश, पाठवले सूर्याचे जवळून काढलेले फोटो, भास्कराचं हे रूप तुम्ही कधीच पाहिलं नसेल

आदित्य-एल१ ने सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपद्वारे सूर्याचा पहिल्यांदाच फुल डिस्क फोटो काढून इस्रोला पाठवला आहे.

ISRO Mission
Gaganyaan ते NISAR; भारत पुन्हा एकदा अवकाश कवेत घेणार! ISRO ने २०२५ पर्यंत १२ मोहिमा आखल्या

इस्रोने २१ ऑक्टोबर रोजी गगनयान मोहिमेची पहिली उड्डाण चाचणी पूर्ण केली. गगनयान मोहिमेमधून मानव अवकाशात पाठवण्याची तसेच भविष्यात अवकाश स्थानक…

Narendra Modi Mission Moon
भारत चंद्रावर अंतराळवीर पाठवणार? पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, मोहिमेचं वर्षही जाहीर केलं

सतत नवनवी यशाची शिखरं सर करणारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने एक मोठं यश मिळवलं आहे.

propulsion module of Chandrayaan 3
इस्त्रोचं आणखी एक मोठं यश, चंद्राकडे पाठवलेलं यान पृथ्वीपर्यंत परत आणलं, आता अंतराळवीर…

इस्रोनं म्हटलं आहे की, चांद्रयान-३ चं प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत परत आणण्यात आपल्या वैज्ञानिकांना यश मिळालं आहे.

Nasa and ESA help to chandrayan 3
चांद्रयान ३ बाबत इस्रोकडून मोठी अपडेट, रॉकेटचा ‘हा’ महत्त्वाचा भाग पृथ्वीच्या कक्षेत परतला!

Chandrayan 3 Updates : एक्सिडेंटल एक्सप्लोजनचा धोका कमी करण्यासाठी क्रायोजेनिक अप्पर स्टेजचा वापर केला जातो.

Brochures on Chandrayaan mission removed from NCERT website mumbai
चंद्रयान मोहिमेवरील पुस्तिका एनसीईआरटीच्या संकेतस्थळावरून हटवल्या

चंद्रयान ३ मोहिमेचे यश शाळा-महाविद्यालयांतून साजरे करण्यासाठी आणि चंद्रयान मोहिम कशी यशस्वी झाली याची माहिती देण्यासाठी एनसीईआरटीने अवांतर वाचनासाठी पुस्तिका…

book
वेदांच्या विज्ञानभरारीवर एनसीईआरटीचे शिक्कामोर्तब

‘चंद्रयान-३’ मोहिमेची महती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) पुस्तिका प्रकाशित केली आहे.

India-Space-Station-PM-Modi
भारत २०३५ पर्यंत ‘अवकाश स्थानक’ उभारणार? कोणत्या देशांकडे असे स्थानक आहे?

अवकाश स्थानक हे कृत्रिम रचना आहे, जे पृथ्वीच्या कक्षेत सामावलेले असते. सध्या चीनकडे स्वतःचे अवकाश स्थानक आहे. तसेच रशियाने आंतरराष्ट्रीय…

Chandrayaan 3 Vikram Lander Will Awake When He Wants ISRO Chief Update About Indias Latest Space Mission In Coming Days
Chandrayaan 3: “विक्रम आनंदाने झोपी गेलाय, आता आम्ही वाट पाहतोय की..”, इस्रो प्रमुखांनी दिला अपडेट

ISRO Chief Update About Chandrayaan 3 Vikram Lander: सोमनाथ यांच्या माहितीनुसार विक्रम सध्या काय करतो याविषयी जाणून घेऊया..

ISRO Chief S Somnath Got NASA Offer To Sell chandrayaan-3 Technology to America His Answer Will Make Proud Credits Modi
चांद्रयान- ३ च्या वेळी इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांना नासाने दिली होती ‘ही’ ऑफर! उत्तर वाचून वाटेल अभिमान

ISRO Chief Speech: सोमनाथ म्हणाले की, नासा आणि युरोप आणि चीनच्या अंतराळ संस्थांमधील प्रत्येकजण चांद्रयान -3 मोहिमेच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन…

ISRO Lander Rover
लँडर, रोव्हर पुन्हा कार्यरत होण्याची शक्यता मावळली; ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांचे मत

भारताच्या चंद्रयान-३ मोहिमेतील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे चांद्रभूमीवर निद्रावस्थेत गेल्यानंतर आता ते पुन्हा जागृती होण्याची कोणतीही शक्यता दिसत…

World Space Week 4-10 October
World Space Week 4-10 October : जागतिक अंतराळ सप्ताह का साजरा केला जातो? जाणून घ्या त्यामागचा इतिहास आणि महत्त्व….

दरवर्षी ४ ते १० ऑक्टोबरदरम्यान जगभरात ‘जागतिक अंतराळ सप्ताह’ साजरा केला जातो.

संबंधित बातम्या

मराठी कथा ×