‘जास्त मायलेज मिळवा किंवा ट्रक परत करा’ योजना; महिंद्राच्या या ट्रकवर मिळणार गॅरेंटी , जाणून घ्या

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने ट्रकच्या मायलेजबाबत नवीन स्पर्धा सुरू केली आहे.

Mahindra_Truck

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने ट्रकच्या मायलेजबाबत नवीन स्पर्धा सुरू केली आहे. कंपनीचा दावा आहे की, त्यांचे ट्रक बाकीच्या ट्रकपेक्षा जास्त मायलेज देतात. या दाव्यासह कंपनीने ‘जास्त मायलेज मिळवा किंवा ट्रक परत करा’ ही अनोखी योजना सुरू केली आहे. जर महिंद्राचा ट्रक बाकीच्या ट्रकपेक्षा चांगला मायलेज देत नसेल तर कंपनी परत घेईल, अशी योजना आहे.

मायलेज हमी योजना महिंद्रा BS-VI ट्रकच्या संपूर्ण श्रेणीला लागू आहे. यात एचसीव्ही, आयसीव्ही आणि एलसीव्ही सीरिजचा समावेश आहे, असं कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नाकरा म्हणाले की, “मायलेज हमी योजना ही हलक्या, मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहन उद्योगासाठी एक ऐतिहासिक पाऊल आहे. इंधनाच्या वाढत्या किमती लक्षात घेता, ही ऑफर देण्याची सर्वोत्तम वेळ आहे. अग्रणी उत्पादने तयार करण्याच्या आणि भारतीय व्यावसायिक वाहन उद्योगासाठी बेंचमार्क सेट करण्याच्या कंपनीचा प्रयत्न आहे. यामुळे ट्रकच्या क्षमतेवर विश्वासाची पुष्टी होईल. तसेच या विभागासाठी बांधिलकी प्रतिबिंबित करेल.”

Suzuki Access 125 VS Hero Maestro Edge 125: या दोन स्कूटरपैकी कोण वरचढ? किंमत, फिचर्स जाणून घ्या

कंपनीच्या मते, नवीन श्रेणीमध्ये फ्यूलस्मार्ट तंत्रज्ञानासह ७.२ लिटर एम पॉवर इंजिन (HCV) आणि एमडीआय टेक इंजिन (ILCV) समाविष्ट आहे. एमटीबीच्या म्हणण्यानुसार, “वाहतूकदाराच्या ऑपरेटिंग खर्चाचा (६० टक्क्यांहून अधिक) इंधन हा प्रमुख घटक आहे हे लक्षात घेता, या स्पर्धात्मक फायद्यात महिंद्रा BS-VI ट्रक श्रेणी एक पाऊल पुढे असेल. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ​​बिझनेस हेड जलज गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, “अधिक मायलेज मिळवा किंवा ट्रक परत द्या ही योजना २०१६ मध्ये आमच्या HCV ट्रक ब्लाझोवर पहिल्यांदा लागू करण्यात आली होती आणि एकही ट्रक परत आला नाही.”

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mahindra group announce get more mileage or give truck back guarantee scheme rmt

Next Story
Suzuki Access 125 VS Hero Maestro Edge 125: या दोन स्कूटरपैकी कोण वरचढ? किंमत, फिचर्स जाणून घ्या
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी