Premium

सणासुदीत आनंद महिंद्रांनी ग्राहकांना दिला धक्का! सात सीटर कारसहित ‘या’ अनेक लोकप्रिय गाड्यांच्या वाढवल्या किमती

महिंद्राने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या लोकप्रिय एसयूव्हीच्या किमती वाढवल्या आहेत. पाहा कोणत्या कारचा यात समावेश आहे…

Mahindra Cars Price Hike
महिंद्राच्या लोकप्रिय गाड्यांच्या किमती वाढल्या (Photo-financialexpress)

Mahindra Cars Price Hike: सणासुदीच्या आधीच महिंद्राने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या लोकप्रिय एसयूव्हीच्या किमती वाढवल्या आहेत. थार, स्कॉर्पिओ एन, XUV300 आणि XUV700 च्या किमतीत ही वाढ करण्यात आली आहे. कंपनीने वाहनांच्या किमती का वाढवल्या आहेत याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नसली तरी पुरवठा साखळीच्या समस्यांना तोंड देत असलेल्या ऑटोमोबाईल क्षेत्राच्या वाढत्या समस्या हेही महिंद्राच्या गाड्या महाग होण्यामागे कारण असू शकते, असे मानले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तथापि, सध्या कंपनीने आपल्या ऑल-इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट SUV XUV400 च्या किमती वाढवलेल्या नाहीत. बोलेरो क्लासिक आणि बोलेरो निओच्या किंमतींची यादीही पूर्वीसारखीच आहे.

कोणती एसयूव्ही अधिक महाग झाली?

मिळालेल्या माहितीनुसार, Scorpio Classic ची किंमत २४ हजार रुपयांवरून २६ हजार रुपयांपर्यंत वाढली आहे. स्कॉर्पिओ एनच्या किमतीत सर्वाधिक वाढ करण्यात आली असून ती आता ६६ हजार रुपयांनी महागली आहे. त्याचवेळी, महिंद्रा थार देखील महाग झाली आहे आणि एसयूव्हीच्या सर्वात स्वस्त मॉडेलची किंमत आता १० लाख रुपयांच्या खाली नाही. थारच्या दरात ४४ हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

(हे ही वाचा : सणासुदीत ग्राहकांना दिलासा! Hyundaiच्या ‘या’ कार्सवर बंपर सूट, पाहा खरेदीवर किती होईल तुमच्या पैशांची बचत )

नवीन दर पाहा

  • थार बद्दल बोलायचे झाले तर आता त्याच्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत १०.९८ लाख रुपये असेल. त्याच्या टॉप व्हेरियंटची किंमत १६.९४ लाख रुपये एक्स-शोरूम असेल.
  • XUV300 बद्दल बोलायचे झाले तर, ते आता ७.९९ लाख ते १४.७६ लाख एक्स-शोरूमच्या किमतीत उपलब्ध असेल.
  • Scorpio Classic चे बेस व्हेरिएंट आता १३.२५ लाख आणि टॉप व्हेरियंट १७.०६ लाख एक्स-शोरूममध्ये उपलब्ध असेल.
  • Scorpio N ची सुरुवातीची किंमत १३.२६ लाख रुपये असेल आणि टॉप व्हेरिएंटची किंमत २४.५३ लाख रुपये एक्स-शोरूम असेल.
  • XUV700 ची किंमत वाढल्यानंतर, बेस व्हेरिएंट १४.०३ लाख आणि टॉप व्हेरिएंट २६.५७ लाख एक्स-शोरूममध्ये उपलब्ध होईल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mahindra price hiked according to the new price list available on the carmakers official website pdb

First published on: 23-09-2023 at 18:56 IST
Next Story
Petrol-Diesel Price on 23 September: पेट्रोल-डिझेल स्वस्त? पाहा १ लीटरसाठी किती पैसे मोजावे लागणारे