Mahindra XUV300 facelift will enter the market this month | Loksatta

वाहनप्रेमींमध्ये चर्चा ‘महिंद्रा XUV300 फेसलिफ्ट’ची; जाणून घ्या फीचर्स आणि बरचं काही…

महिंद्रा भारतीय बाजारपेठेत सर्वात स्पर्धात्मक कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये एक्सयूव्ही ३०० लाँच करण्याच्या विचारात आहे.

वाहनप्रेमींमध्ये चर्चा ‘महिंद्रा XUV300 फेसलिफ्ट’ची; जाणून घ्या फीचर्स आणि बरचं काही…
Pic Credit-File Photo

भारतीय वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा आणि महिंद्रा भारतात त्यांची लोकप्रिय एसयूव्ही कॉम्पॅक्ट एक्सयूव्ही ३०० चे फेसलिफ्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. महिंद्रा भारतीय बाजारपेठेत सर्वात स्पर्धात्मक कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये एक्सयूव्ही ३०० लाँच करण्याच्या विचारात आहे. आता देशांतर्गत ऑटोमेकर या सेगमेंटमध्ये आपले स्थान पुन्हा मिळवण्यासाठी अधिक खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनी ही अपडेटेड एसयुव्ही बाजारात लॉन्च करण्याचा विचार करत आहे. २०१९ मध्ये सर्वात आधी ही गाडी लॉन्च झाल्यानंतर जवळजवळ पाच वर्षांनी म्हणजेच २०२४ च्या सुरुवातीला ही गाडी प्रत्यक्षात बाजारामध्ये दाखल होणार आहे.

महिंद्रा एक्सयूव्ही ३०० फेसलिफ्टमध्ये “ट्विन पीक्स” लोगो (समोर आणि मागील), क्रोम-स्टडेड ग्रिल, एलईडी डीआरएलसह प्रोजेक्टर हेडलाइट्स, सिल्व्हर स्किड प्लेट्स, एक रेक विंडस्क्रीन आणि समोर एक विस्तीर्ण एअर डॅमसह मस्कुलर बोनेट असा भन्नाट लूक देण्यात आला आहे. एसयूव्हीला साइड रूफ रेल, ओराव्हीएम, फ्लेर्ड व्हील आर्च आणि नवीन डिझाइन केलेले अलॉय व्हील्स मिळतील. या व्यतिरिक्त गाडीमध्ये रॅप-अराउंड एलईडी टेललाइट्स देखील मिळतील.

आणखी वाचा : टाटा मोटर्सची दमदार कामगिरी! एका महिन्यात विकल्या ‘इतक्या’ कार; आकडा वाचून व्हाल दंग…

इंजिन आणि किंमत

नवीन फेसलिफ्ट एक्सयूव्ही ३०० च्या तांत्रिक बाबी अद्याप समोर आलेल्या नाहीत. या एक्सयूव्हीला १.२ लीटरचे चांगले री-ट्यून केलेले पेट्रोल इंजिन दिले जाईल अशी अपेक्षा आहे, ज्याची कमाल १२८ बीएचपी पॉवर जनरेट करण्याची क्षमता असेल. याशिवाय, हे १.५ लीटर डिझेल इंजिनसह जे ११६.५ बीएचपी पॉवर जनरेट करण्याच्या क्षमतेचं असेल. अद्ययावत महिंद्रा एक्सयूव्ही ३०० ची किंमत आणि उपलब्धता ७ ऑक्टोबर रोजी आयोजित इव्हेंट दरम्यान घोषित केली जाईल. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही गाडी प्रत्यक्षात २०२४ च्या सुरुवातीला बाजारपेठेत दाखल होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
टाटा मोटर्सची दमदार कामगिरी! एका महिन्यात विकल्या ‘इतक्या’ कार; आकडा वाचून व्हाल दंग…

संबंधित बातम्या

सेकेंड हँड कार खरेदी करण्याचा विचार करताय? आता ‘ही’ कंपनी विकणार सेकंड हँड कार; ४० हजार किंमीची वॉरंटीसह मिळणार बरंच काही
Petrol-Diesel Price on 1 December 2022: डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये मोठी उलाढाल; पाहा नवे दर
झकास! बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरचा त्याच्या ‘या’ लक्झरी कारसोबतचा फोटो झाला व्हायरल
Auto Expo 2023: बाजारपेठेत धुमाकूळ घालायला येतेय Hyundai Creta CNG; मारुतीच्या ग्रँड विटारा, हायरायडरला देणार टक्कर
कार, दुचाकी चालवत असाल तर सावधान; गेल्या २३ महिन्यात वाहतूक नियम मोडणाऱ्यांना…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
विवाह समुपदेशन: भांडणांत मुलांची मधस्थी नकोच नातेसंबंध,
पाथरीकरांची ‘श्रद्धा’ पण शासनाची ‘सबुरी’!; साईबाबा तीर्थक्षेत्र आराखडा तीन वर्षांपासून रखडला
रेल्वेमुळे तुळजापूर, उस्मानाबादच्या विकासाचा मार्ग मोकळा
स्मृतिभ्रंश आजार बरा करणारे औषध शोधण्यात यश ; वृद्धांना मोठा दिलासा
आरोग्य वार्ता : ‘फ्लू’ची लस हृदयरुग्णांसाठी लाभदायी