Mahindra Car Price Hike: महिंद्रा अँड महिंद्राने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे, कंपनीने आपल्या सब-कॉम्पॅक्ट SUV Mahindra XUV300 च्या टर्बोस्पोर्ट व्हेरियंटची किंमत ४३ हजार रुपयांनी वाढवली आहे. तुम्हाला ही महिंद्रा कार W6, W8 आणि W8 (O) व्यतिरिक्त तीन ट्रिम पर्यायांमध्ये मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिंद्रा XUV300 चा टर्बो पेट्रोल प्रकार BS6 फेज २ कम्पलांयेससह या वर्षी मार्चमध्ये लाँच करण्यात आला. कारच्या अधिकृत लाँचनंतर प्रथमच किमतीत वाढ झाली आहे. या कारचे कोणते व्हेरिएंट इतके महाग झाले आहे याची माहिती खालीलप्रमाणे सांगण्यात आली आहे.

Mahindra XUV300 ची किंमत जाणून घ्या

  • Mahindra XUV300 TurboSport W6 मॉडेलची जुनी किंमत १० लाख ३५ हजार होती आणि आता हा प्रकार १० लाख ७१ हजारांमध्ये उपलब्ध होईल, म्हणजेच या मॉडेलच्या किंमतीत ३६,४०० रुपयांची वाढ झाली आहे.

(हे ही वाचा : मार्केट गाजवणारी Honda Activa देशातून निरोप घेणार? आता बाजारात दिसणार नाही ‘हे’ लोकप्रिय मॉडेल!)

  • W8 मोनोटोन व्हेरिएंटची जुनी किंमत ११.६५ लाख होती आणि आता किंमत वाढल्यानंतर हा प्रकार १२.०२ लाखांना विकला जाईल. म्हणजेच या मॉडेलची किंमत ३७,३०० रुपयांनी वाढली आहे.
  • W8 ड्युअल टोन व्हेरिएंटची किंमत आधी ११.८० लाख होती पण आता किंमत वाढल्यानंतर हे मॉडेल विकत घेण्यासाठी १२.१४ लाख रुपये खर्च करावे लागतील, म्हणजेच हा प्रकार ३४ हजार रुपयांनी महाग झाला आहे.
  • W8 (O) च्या ड्युअल टोन व्हेरिएंटची किंमत आता १२.९० लाख रुपयांऐवजी १३.३० लाख रुपये असेल, म्हणजेच या व्हेरिएंटची किंमत ४०,४०० रुपयांनी वाढली आहे.

किमतीत वाढ झाल्यानंतर आता या महिंद्रा कारची किंमत १० लाख ७१ हजार रुपयांपासून सुरू होईल, जी १३ लाख ३० हजार रुपयांपर्यंत जाईल. वर नमूद केलेल्या सर्व किमती एक्स-शोरूम किमती आहेत.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahindra xuv300 turbosport gets its first price increment becomes dearer by up to rs 43000 all you need to know pdb