Maruti Suzuki Engage 7 Seater Car: मारुती सुझुकी आपली नवीन ७-सीटर MPV कार लवकरच बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच एक ऑनलाइन दस्तऐवज लीक झाला आहे ज्यामध्ये कंपनीने नवीन ट्रेडमार्क ‘Engage’ साठी अर्ज केला आहे. असे सांगितले जात आहे की कंपनी हा ट्रेडमार्क आपल्या आगामी नवीन MPV कारसाठी वापरू शकते. या नवीन MPV बद्दल आणखी एक अहवाल समोर आला आहे की तो सध्याच्या Toyota Innova Hycross वर आधारित असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मारुती सुझुकीच्या वार्षिक आर्थिक निकालाच्या पत्रकार परिषदेदरम्यान कंपनीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी सांगितले होते की, आम्ही सादर करणार असलेले नवीन उत्पादन टोयोटाकडून घेतलेले वाहन असेल आणि ते तीन-रो असलेले मजबूत-हायब्रिड मॉडेल असेल. किमतीच्या बाबतीत ते अव्वल मॉडेल असेल असेही त्यांनी सांगितले. म्हणजेच मारुती सुझुकीच्या पोर्टफोलिओमधली ही सर्वात महागडी कार असेल.

(हे ही वाचा: Mahindra Bolero, Scorpio, सर्व विसरुन जाल, ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त ८ सीटर कार, मोठ्या फॅमिलीसाठी बेस्ट )

सुझुकी आणि टोयोटा यांच्यात खूप पूर्वी एक करार झाला आहे, ज्या अंतर्गत दोन्ही कंपन्या त्यांचे वाहन प्लॅटफॉर्म आणि तंत्रज्ञान एकमेकांसोबत शेअर करतात. त्यानंतर भारतीय बाजारपेठेत ग्रँड विटारा-हायराइड, बलेनो-ग्लांझा यांसारख्या कारसह काही मॉडेल्स सादर करण्यात आली आहेत. आता मारुती सुझुकी टोयोटा इनोव्हा हायक्रॉसवर आधारित त्यांची नवीन एमपीव्ही तयार करत आहे.

Maruti Suzuki Engage मध्ये काय असेल खास?

जरी या कारशी संबंधित सर्व माहिती अद्याप समोर आलेली नाही, परंतु जर कंपनीने इनोव्हावर आधारित एमपीव्हीला Engage असे नाव दिले तर त्याच्या डिझाइनमध्ये काही नवीन घटक दिसण्याची शक्यता आहे. कंपनीची सध्याची इनोव्हा हायक्रॉस समोरची लोखंडी जाळी, बॅजिंग इत्यादी बदलू शकते. याशिवाय इंजिन, फीचर्स आणि तांत्रिक वैशिष्ट्यांच्या बाबतीत ही कार इनोव्हासारखीच असेल.

हे शक्य आहे की कंपनी ते २.०-लीटर पेट्रोल इंजिनसह बाजारात लाँच करेल, कारण ते हायब्रिड मॉडेल असेल, त्यात इलेक्ट्रिक मोटर देखील मिळेल. जे संयुक्तपणे १८३.४ bhp पॉवर आणि २०६ Nm टॉर्क जनरेट करेल.

(हे ही वाचा: मारुती, टाटाच्या गाड्यांचा नव्हे तर ‘या’ Mid-Size SUV चा देशात बोलबाला, शोरूम्समध्ये तोबा गर्दी,  किंमत… )

Maruti Suzuki Engage कधी होणार लाँच?

मारुती सुझुकीने ७ सीटर कारबद्दल अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, कंपनी येत्या दोन महिन्यांत ही कार सादर करू शकते. तसेच या कारचे बुकिंग जून महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. आता कंपनी या कारची काय किंमत ठरवते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. सध्याच्या इनोव्हा हायक्रॉसच्या किंमती टॉप मॉडेलसाठी १८.५५ लाख ते २९.७२ लाख (एक्स-शोरूम) आहेत. मारुती सुझुकीची नवीन प्रीमियम एमपीव्ही जुलै २०२३ पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होईल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti suzuki has trademarked the name engage in the country the brand could use this name for its seven seater mpv pdb