Maruti Suzuki sales in November 2023: देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीच्या कार देशभरात खूप पसंत केल्या जातात. या कंपनीच्या कारची विक्री तुफान होत असते. आता नोव्हेंबर २०२३ मध्ये मारुती सुझुकी इंडियाची एकूण विक्री ३.३९ टक्क्यांनी वाढून १ लाख ६४ हजार ४३९ युनिट्स झाली आहे, तर गेल्या वर्षी याच महिन्यात हा आकडा १ लाख ५९ हजार ०४४ युनिट्स होता. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, प्रवासी वाहने, व्यावसायिक वाहने आणि थर्ड पार्टी सप्लायसह एकूण देशांतर्गत विक्री गेल्या महिन्यात १.५७ टक्क्यांनी वाढून १ लाख ४१ हजार ४८९ युनिट्सवर पोहोचली आहे, तर वर्षभरापूर्वी याच कालावधीत विक्री १ लाख ३९ हजार ३०६ युनिट्सवर पोहोचली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशांतर्गत प्रवासी वाहनांची एकूण विक्री गेल्या महिन्यात १.३३ टक्क्यांच्या वाढीसह १ लाख ३४ हजार १५८ युनिट्सवर होती, तर नोव्हेंबर २०२२ मध्ये १ लाख ३२ हजार ३९५ युनिट्सची विक्री झाली होती. कंपनीकडून सांगण्यात आले की अल्टो आणि एस-प्रेसोसह कमी किमतीच्या कारची विक्री गेल्या वर्षी याच महिन्यात १८ हजार २५१ युनिट्स होती, त्या तुलनेत ही विक्री ९ हजार ९५९ युनिट्सवर आली.

(हे ही वाचा: ऐन थंडीच्या दिवसांत तब्बल १ कोटी रुपयांच्या ‘या’ कारला लागली आग, Video होतोय व्हायरल, कारण आलं समोर… )

त्याचप्रमाणे बलेनो, सेलेरियो, डिझायर, इग्निस, स्विफ्ट आणि वॅगनआर सारख्या मॉडेलसह कॉम्पॅक्ट कारची विक्री नोव्हेंबर २०२३ मध्ये ६४ हजार ६७९ युनिट्स होती, जी गेल्या वर्षी याच महिन्यात ७२ हजार ८४४ युनिट्स होती. त्याच वेळी, Brezza, Ertiga, Fronx, Grand Vitara, Invicto, Jimny, S-Cross आणि XL 6 यासह युटिलिटी वाहनांची विक्री गेल्या महिन्यात ४९ हजार ०१६ युनिट्सवर होती, तर वर्षभरापूर्वी याच कालावधीत हा आकडा ३२ हजार ५६३ युनिट्स होता.

कंपनीकडून माहिती देण्यात आली की, मध्यम आकाराच्या सेडान सियाझची विक्री गेल्या महिन्यात केवळ २७८ युनिट्स होती, जी नोव्हेंबर २०२२ मध्ये १ हजार ५५४ युनिट्स होती. Van Eeco ची विक्री १० हजार २२६ युनिट्सवर होती, जी एका वर्षापूर्वी याच महिन्यात ७ हजार १८३ युनिट्स होती. मारुती सुझुकीने सांगितले की, गेल्या महिन्यात त्यांची निर्यात २२ हजार ९५० युनिट्सपर्यंत वाढली, जी नोव्हेंबर २०२२ मध्ये १९,७३८ युनिट्स होती.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti suzuki india reported a 3 39 percent gain in total sales at 164439 units in november 2023 pdb