Maruti Suzuki Jimny: मारुती सुझुकी जिमनी या वर्षी जानेवारीमध्ये ऑटो एक्सपोमध्ये अनावरण करण्यात आली होती. पाच-दरवाज्यांची ऑफ-रोडर असलेल्या जिमनीची काही दिवसांआधीच बुकिंग सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत या गाडीला २३ हजारांहून जास्त बुकिंग मिळाली आहे. आता ही कार लवकरच भारतीय बाजारपेठेत लाँच होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मारुती सुझुकी जिमनी लुक आणि डिझाइन

मारुती जिमनी सिझलिंग रेड, ग्रेनाइट ग्रे, नेक्सा ब्लू, ब्लूश ब्लॅक, पर्ल आर्क्टिक व्हाइट, सिझलिंग रेड विथ ब्लूश के रूफ आणि कायनेटिक यलो विथ ब्लॅक रूफ या दोन प्रकारांमध्ये आणि सात रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. मारुती सुझुकी जिमनीची लांबी ३.९८ मीटर, रुंदी १.६४ मीटर आणि उंची १.७२ मीटर आहे. जिमनीचा व्हीलबेस २५९०mm आणि ग्राउंड क्लीयरन्स २१०mm आहे. SUV ला ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स, फोल्डेबल साइड मिरर, हेडलॅम्प वॉशर, एलईडी हेडलॅम्प आणि DRLs, फॉग लॅम्प्स, अलॉय व्हील मिळतात.

(हे ही वाचा : ग्राहकांना झटका! Maruti Alto ला टक्कर देणारी सर्वात स्वस्त कार कंपनीने केली बंद, किंमत ४.३ लाख )

मारुती सुझुकी जिमनी वैशिष्ट्ये

पाच दरवाजांच्या जिमनीमध्ये Apple CarPlay आणि Android Auto सह नऊ इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस कनेक्टिव्हिटी आणि स्वयंचलित हवामान नियंत्रण यासारख्या वैशिष्ट्यांसह येतो. तसेच, यात क्रूझ कंट्रोल, सहा एअरबॅग्ज, १५-इंच अलॉय व्हील्स, फॉग लाइट्स, वॉशरसह एलईडी हेडलॅम्प अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत.

Maruti Jimny मध्ये, कंपनीने १.५-लिटर K-Series Natural Aspirated पेट्रोल इंजिन वापरले आहे, जे १०३ bhp ची मजबूत पॉवर आणि १३४ Nm टॉर्क जनरेट करते. जिमनीच्या पेट्रोल टाकीची क्षमता ४० लिटरच्या जवळपास आहे.

(हे ही वाचा : ‘या’ कारच्या खरेदीसाठी ग्राहकांची चेंगराचेंगरी, तुफान मागणी पाहून कंपनीला बंद करावी लागली बुकिंग, वेटिंग पीरियड २० महिन्यांवर )

मारुती सुझुकी जिमनी कधी होणार लाँच?

मारुती जिम्नीला फक्त २५ हजार रुपयाच्या टोकन अमाउंट देऊन ऑनलाइन किंवा डीलरशीपकडे जाऊन या बुक करता येऊ शकते. मारुती जिमनीला आतापर्यंत २३,००० बुकिंग मिळाले आहेत. ही एसयूव्ही डीलरशिपपर्यंत पोहोचू लागली आहे. ही ऑफ-रोड कार मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात लाँच होऊ शकते, अशी माहिती आहे. या कारची अंदाजित किंमत १० ते १५ लाख रुपये दरम्यान असू शकते, अशी माहिती आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti suzuki jimny launch in india in the second week of may engine feature and booking information is known pdb