मारुती सुझुकीने भारतीय बाजारात नवीन Fronx क्रॉसओवरची CNG आवृत्ती लाँच केली आहे. Fronx सीएनजी सिग्मा आणि डेल्टा या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, ज्याची किंमत अनुक्रमे रु. ८.४१ लाख आणि रु.९.२७ लाख आहे. Fronx सीएनजी पेट्रोल व्हेरिएंटच्या तुलनेत अंदाजे ९३,५०० रुपयांनी महाग आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवीन मारुती सुझुकी Fronx १.२-लीटर के-सीरीज ड्युअलजेट, फॅक्टरी-फिट सीएनजी किटसह ड्युअल व्हीव्हीटी इंजिनद्वारे समर्थित आहे. CNG मोडमध्ये, इंजिन ६०००rpm वर ७७.५PS पॉवर आणि ४,३००rpm वर ९८.५Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

(हे ही वाचा : Tata च्या ५.६० लाखाच्या कारवर अख्खा देश फिदा, ह्युंदाई-महिंद्रा पाहतच राहिल्या, झाली धडाधड विक्री )

हे CNG वर २८.५१ किमी/किलो मायलेज देते. जर आपण पेट्रोल मोडबद्दल बोललो, तर हे इंजिन ६,०००rpm वर ८९bhp आणि ४,४००rpm वर 113Nm पीक टॉर्क जनरेट करते. पेट्रोलमध्ये ५-स्पीड मॅन्युअल तसेच AMT पर्याय आहे.

नवीन Fronx सीएनजी लाँच केल्यामुळे, मारुती सुझुकीकडे आता सीएनजी श्रेणीतील पोर्टफोलिओमध्ये १५ मॉडेल्स आहेत. एंट्री-लेव्हल सिग्मा व्हेरियंटमध्ये हॅलोजन प्रोजेक्टर हेडलॅम्प, कीलेस एंट्री अँड गो, ऑटोमॅटिक एसी, फॅब्रिक सीट अपहोल्स्ट्री, हिल होल्ड असिस्ट, ईएसपी, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, ड्युअल एअरबॅग्ज आणि रिअर डीफॉगर यांसारख्या वैशिष्ट्यांसह येतो.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti suzuki launched a cng version of fronx suv the new model will offer 28 51 kmkg starting at rs 8 41 lakh pdb