Best Selling SUV in India: आर्थिक वर्ष २०२३-२४ चा पहिला महिना बहुतांश कार कंपन्यांसाठी चांगला राहिला आहे. एप्रिल महिन्यातील कार विक्रीचे आकडे आपल्यासमोर आले आहेत. देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या दहा गाड्यांपैकी सहा गाड्या मारुती सुझुकीच्या आहेत, तर ह्युंदाई आणि टाटा मोटर्सच्या दोन-दोन गाड्यांचा समावेश आहे. मारुती सुझुकी वॅगनआर ही एप्रिलमध्ये देशात सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली आहे. तर मार्च महिन्यात पहिल्या क्रमांकावर असलेली मारुती सुझुकी स्विफ्ट यावेळी दुसऱ्या क्रमांकावर घसरली आहे. याशिवाय सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हीमध्येही उतार-चढाव दिसून आला आहे.

बेस्ट सेलिंग एसयूव्ही

Tata Nexon ने एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा लढाई जिंकली आहे. १५,००२ युनिट्स विकल्या गेल्याने, ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी SUV होती. एकूण कार विक्रीत ते चौथ्या क्रमांकावर होते. Tata Nexon ने Hyundai Creta आणि Maruti Brezza ला मागे टाकले.

(हे ही वाचा : देशात नंबर १ बनण्याच्या शर्यतीत ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरची बाजी, Hero, Ather ला ही टाकलं माग, खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा )

या यादीत Hyundai Creta दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने एप्रिल महिन्यात १४,१८६ युनिट्सची विक्री केली. त्याचप्रमाणे मार्च महिन्यात सर्वाधिक विक्री झालेला मारुती ब्रेझा तिसऱ्या क्रमांकावर घसरला आणि ११,८३६ मोटारींची विक्री झाली.

एप्रिलमध्ये सर्वाधिक विक्री होणारी SUV

Tata Nexon – १५,००२ युनिट्स
Hyundai Creta – १४,१८६ युनिट्स
Maruti Suzuki Brezza – ११,८३६ युनिट्स
Tata Punch – १०,९३४ युनिट्स
Hyundai Venue – १०,३४२ युनिट्स