Maruti Suzuki XL6: भारतात अलीकडच्या काळात मल्टी पर्पज व्हेईकल्स अर्थात् MPV गाड्यांची मागणी वाढली आहे. फेब्रुवारी महिन्याबद्दल बोलायचे झाल्यास, MPV सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी एर्टिगाने सर्वाधिक विक्री केली आहे. याशिवाय सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप-५ कार किआ केरेन्स, टोयोटा इनोव्हा हायक्रॉस, रेनॉल्ट ट्रायबर आणि मारुती सुझुकी XL6 या आहेत. यापैकी Kia Carens, Toyota Innova Highcross आणि Maruti Suzuki XL6 यांना Ertiga आणि Triber च्या तुलनेत प्रीमियम MPV म्हटले जाऊ शकते. या तिघांपैकी Kia Carens आणि Maruti Suzuki XL6 या सर्वात जवळच्या MPV आहेत. चला तर मग त्यांच्या विक्रीचे आकडे पाहूया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मारुती सुझुकी XL6 ही सध्या NEXA प्रीमियम डीलरशिप नेटवर्कद्वारे विकली जाणारी एकमेव MPV आहे. हे ६-सीटर लेआउटमध्ये येते. कंपनीने फेब्रुवारी २०२३ मध्ये XL6 MPV च्या २,१०८ युनिट्सची विक्री केली आहे जी गेल्या वर्षी याच महिन्यात २,५८२ युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच, त्याच्या विक्रीत १८.३६ टक्क्यांची घट झाली आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप-5 MPV च्या यादीत ते पाचव्या क्रमांकावर आहे.

(हे ही वाचा : Ertiga, Creta चा गेम होणार; देशात येतेय सर्वात स्वस्त ७ सीटर कार, किंमत आहे फक्त… )

मारुती सुझुकी XL6 शी स्पर्धा करत Kia Carens ही बाजारात दुसरी सर्वाधिक विक्री होणारी MPV ठरली आहे. हे ६ आणि ७ सीटिंग लेआउटमध्ये येते. फेब्रुवारी २०२३ मध्ये, Kia Carens च्या ६,२४८ युनिट्सची विक्री झाली आहे, जी Maruti Suzuki XL6 च्या विक्रीपेक्षा खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत, मारुती सुझुकी XL6 पेक्षा Kia Carens ने लोकांमध्ये चांगली पकड निर्माण केली आहे असे म्हणता येईल.

दोन्हीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Kia Carens ची किंमत श्रेणी १०.४५ लाख ते १८.९५ लाख रुपये (एक्स-शोरूम, संपूर्ण भारत) दरम्यान आहे. तर, मारुती सुझुकी XL6 ची किंमत ११.४१ लाख ते १४.६७ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) दरम्यान आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti suzuki xl6 the company has sold 2108 units of xl6 mpv in february 2023 as compared to 2582 units sold in the same month last year pdb
First published on: 27-03-2023 at 13:09 IST