MG Comet EV Booking Opens In Indian Market: MG Motor ने भारतात आपली बहुप्रतीक्षित MG Comet EV नुकतीच लाँच केली. आता या स्वस्त कारची कंपनीने बुकिंग १५ मे २०२३ सोमवारपासून सुरू केली आहे. ही दोन दरवाजा चार सीटर कार आहे, जी अतिशय कॉम्पॅक्ट आकारात येते. त्याची लांबी ३ मीटरपेक्षा कमी आहे. कंपनीचा दावा आहे की, तिची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर २३० किलोमीटरची रेंज देईल आणि महिनाभर चालवण्याचा खर्च फक्त ५९९ रुपये आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या ५,००० ग्राहकांना फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या प्रास्ताविक किमतीचा मिळेल लाभ

MG Motor India ने दुपारी १२ वाजता आपल्या स्वस्त इलेक्ट्रिक कार कॉमेट ईव्हीचे बुकिंग सुरू केले आहे. MG Comet ईव्हीची डिलिव्हरी पुढील काही दिवसांत सुरू होईल. पहिल्या ५००० ग्राहकांना फक्त ७.९८ लाख रुपयांच्या प्रास्ताविक किमतीचा लाभ मिळेल. यानंतर MG आपल्या स्वस्त इलेक्ट्रिक कारची किंमत वाढवू शकते. तुम्ही ११,००० रुपये टोकन रक्कम भरून MG Comet EV बुक करू शकता. एमजी मोटर केवळ शहरी राइडसाठी कॉमेट ईव्हीसह ८ वर्षे किंवा १ लाख २० हजार किलोमीटरपर्यंत बॅटरीची वॉरंटी देत ​​आहे.

(हे ही वाचा : मारुतीच्या कारनं ग्राहकांना लावलं वेड, कंपनीकडे ४ लाखांहून अधिक वाहनांचे बुकिंग्स, शोरूम्समध्ये लोकांची तुफान गर्दी)

MG Comet EV चा लुक आणि डिझाईन खूपच आकर्षक

देशातील सर्वात छोटी इलेक्ट्रीक कार MG Comet EV चा लुक आणि डिझाईन खूपच आकर्षक आहे, कंपनीनं तरुण वर्गाची आवड लक्षात घेऊन ते तयार केलंय. ही कार इंडोनेशियन बाजारात विकली जाणारी Wuling Air EV चं रिबॅज केलेलं व्हर्जन आहे. कंपनीनं ही कार अनेक वेगवेगळ्या रंगांमध्ये सादर केली असून ती दैनंदिन प्रवासासाठी उत्तम असल्याचे मानले जात आहे. आकाराच्या बाबतीत, ही इलेक्ट्रीक कार बाजारात उपलब्ध असलेल्या त्यांच्या प्रतिस्पर्धी Tiago EV पेक्षा लहान आहे.

कंपनीचा दावा आहे की, ही कार एका चार्जवर २३० किमीची रेंज देते. ही १७.३ kWh बॅटरीद्वारे समर्थित आहे. जी ४२ hp पॉवर आणि ११० Nm टॉर्क जनरेट करते. हे GSEV प्लॅटफॉर्मवर तयार केलेले ४-सीटर वाहन आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mg comet ev bookings open today book now for a token amount of rs 11000 comet ev at an introductory price of 7 98 lakh ex showroom pdb