Tesla car price : जगातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रीक व्हिकल कंपनी टेस्लाने भारतात पाऊल ठेवले आहे. टेस्लाने मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स (बीकेसी) मध्ये देशातील पहिले शोरुम उघडले आहे. यानंतर देशातील पहिली टेस्ला कार खरेदी करण्याचा मान शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी पटकावला आहे. याबाबत प्रताप सरनाईक यांनी माध्यमांना माहिती दिली. देशातील टेस्लाची पहिली गाडी मीच खरेदी करणार, असा निर्धार प्रताप सरनाईकांनी व्यक्त केला होता. त्यानंतर प्रताप सरनाईकांनी टेस्लाची कार खरेदी केली.

प्रताप सरनाईकांनी घेतलेल्या Tesla Model Y कारची किंमत किती?

टेस्लाच्या Model Y च्या RWD व्हर्जनची किंमत ६१.०७ लाख रुपये असून, LR RWD व्हर्जनसाठी ही किंमत ६९.१५ लाख रुपये इतकी आहे. आपल्या आवडीचा रंग हवा असल्यास त्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतील.भारतात ही कार पूर्णपणे आयात (CBU) करून आणली जात असल्यामुळे किंमतीत वाढ झालेली आहे. Model Y ही टेस्लाची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे आणि जगभरात सर्वोच्च विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे.

फीचर्स काय?

नवीन Model Y मध्ये अंतर्बाह्य रचनेत बदल करण्यात आले असून, मागील सीटसाठी स्वतंत्र टचस्क्रीन आणि इलेक्ट्रिक अॅडजस्टेबल फंक्शनदेखील देण्यात आलेत. टेस्ला कंपनीची 3RWD या मॉडेलची कार अवघ्या ५.६ सेकंदात शून्य ते १०० इतका वेग गाठू शकते. Tesla 3 LR RWD ही कार एकदा चार्ज केल्यानंतर ६२२ किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करु शकते. टेस्लाची स्टँटर्ड RWD व्हर्जनची कार एकदा चार्ज केल्यानंतर ५०० किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करु शकते. नवीन Model Y मध्ये बाह्य व आतील रचनेत बदल करण्यात आले असून, आता मागील सीटसाठी स्वतंत्र टचस्क्रीन आणि इलेक्ट्रिक अॅडजस्टेबल फंक्शनदेखील देण्यात आले आहेत.