Bugatti Chiron Supercar: जगभरात कारची आवड असणाऱ्यांची संख्या खूप आहे. प्रत्येक व्यक्तीचे मनपसंत गाडी खरेदी करण्याचे स्वप्न असते. हीच माझ्या स्वप्नातील कार असं म्हणत अनेक जण आपली आवडती कार खरेदी करण्यासाठी जीवाचे रान करतात. मनपसंत कार खरेदी करण्यासाठी कारप्रेमी कोट्यवधी रुपये मोजायलाही मागेपुढे पाहत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेकडो भारतीय आहेत ज्यांच्याकडे रोल्स रॉयस आणि रेंज रोव्हरसह जगभरातील कार कंपन्यांच्या लाखो कार आहेत. असाच एका एनआरआयकडे आलिशान बुगाटी कार आहे. अमेरिकेत राहणारे मयूर श्री बुगाटी चिरॉन (Bugatti Chiron) चे मालक असलेले ते जगातील एकमेव भारतीय आहेत. त्याच्याशिवाय, संपूर्ण जगात बुगाटी चिरॉनचा मालक असलेला दुसरा भारतीय नाही.

मयूरश्रीने काही वर्षांपूर्वी चिरॉन खरेदी केली होती. चिरॉनसाठी त्याने नेमकी किती किंमत मोजली हे माहित नाही, परंतु अंदाज आहे की त्याने सुमारे २१ कोटी रुपये दिले असावेत. तर, खरेदीदारांना पर्यायी अतिरिक्त उपकरणे बसवल्यास, त्यांना जास्त किंमत मोजावी लागेल.

(हे ही वाचा: टाटा, महिंद्राचे धाबे दणाणले, Hyundai अन् Kia खेळणार नवा गेम, दोन Midsize SUV आणतेय नव्या अवतारात)

मयूर श्री हा रिअल इस्टेट व्यावसायिक असून तो टेक्सास, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे कार्यरत आहे. मयूरच्या गॅरेजमध्ये असलेली बुगाटी चिरॉन ही त्याची सर्वात महागडी कार आहे. Bugatti Chiron मध्ये ८.०-लीटर, क्वाड-टर्बोचार्ज्ड W१६ इंजिन आहे जे १,४७९ Bhp आणि १,६०० Nm पीक टॉर्क निर्माण करते.

कारच्या चारही चाकांना वीजपुरवठा करण्यासाठी त्यात हॅलडेक्स ऑल-व्हील-ड्राइव्ह प्रणाली देण्यात आली आहे. जगात बुगाटी चिरॉनचे फक्त १०० युनिट्स आहेत. ही कार रस्त्यावर फार दुर्मिळ आहे. ही जगातील सर्वात वेगवान कार आहे.

कार इतकी वेगवान आहे की, त्याचा टॉप स्पीड सामान्य रस्त्यावरही गाठता येत नाही. Bugatti Chiron चा टॉप स्पीड ४२० kmph आहे. ही कार ० ते १०० किमी प्रतितास वेग पकडण्यासाठी फक्त २.५ सेकंद घेते. या सुपरकारचा लूक आणि वैशिष्ट्ये अशी आहेत की ती पाहून कोणीही या कारच्या प्रेमात पडतील.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nri named mayur shree who lives in america has a bugatti chiron a supercar which is priced at rs 21 crore pdb