पाच लाखांपेक्षा कमी किमतीत मिळतेय Mahindra Thar, जाणून घ्या काय आणि कुठे आहे ऑफर? | second hand mahindra thar from 4 to 5 lakh with finance plan know offers and complete details of off road suv prp 93 | Loksatta

पाच लाखांपेक्षा कमी किमतीत मिळतेय Mahindra Thar, जाणून घ्या काय आणि कुठे आहे ऑफर?

काही लोकांना ही गाडी आवडते पण तिच्या किंमतीमुळे बरेच लोक ती खरेदी करण्यासाठी बजेट तयार करू शकत नाहीत. मग ही ऑफऱ नक्की वाचा.

पाच लाखांपेक्षा कमी किमतीत मिळतेय Mahindra Thar, जाणून घ्या काय आणि कुठे आहे ऑफर?
(फोटो- CARTRADE)

ऑफ रोड SUV सेगमेंटमध्ये फक्त काही SUV आहेत, त्यापैकी एक महिंद्र थार आहे, ज्यांना त्याच्या डिझाइनसाठी तसंच त्याच्या इंजिन, साहसी आणि स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटीजसाठी पसंत केली जाते.

Mahindra Thar Price

महिंद्रा थारची किंमत १३. ५३ लाखापासून ते १६.०३ लाखापर्यंत (एक्स-शोरूम, दिल्ली) असते. काही लोकांना ही गाडी आवडते पण तिच्या किंमतीमुळे बरेच लोक ती खरेदी करण्यासाठी बजेट तयार करू शकत नाहीत. हे लक्षात घेऊन आम्ही या एसयूव्हीच्या सेकंड हँड मॉडेलवर उपलब्ध असलेल्या काही ऑफर्सची यादी करत आहोत ज्या तुमच्या बजेटमध्ये बसू शकतात.

महिंद्रा थारवरील या ऑफर्स सेकंड हँड वाहनांची खरेदी आणि विक्री करणाऱ्या वेगवेगळ्या वेबसाइटवरून घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणतीही सेकंड हँड कार खरेदी करण्यापूर्वी त्यांची मूळ स्थिती, कागद आणि इतर गोष्टी तपासूनच डील फायनल करा, अन्यथा तुम्हाला नुकसान सोसावे लागू शकते.

Second Hand Mahindra Thar खरेदी करण्याची पहिली ऑफर DROOM वेबसाइटवरून घेतली आहे. महिंद्रा थारचे २०१५ चे मॉडेल येथे लीस्ट केले आहे ज्याची नोंदणी हरियाणा क्रमांकावर आहे. या एसयूव्हीची किंमत ४.४ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ती खरेदी करण्यासाठी तुम्हाला फायनान्स प्लॅनची ​​सुविधा देखील मिळू शकते.

आणखी वाचा : केवळ ४५ हजार भरून घरी घेऊन जा Datsun redi GO, जाणून घ्या EMI

Mahindra Thar Second Hand मॉडेलवर उपलब्ध असलेली दुसरी ऑफर OLX वेबसाइटवर देण्यात आली आहे. येथे महिंद्रा थारचे २०१५ चे मॉडेल उत्तर प्रदेशमध्ये नोंदणीसह विक्रीसाठी लीस्ट आहे. त्याची किंमत ४.७५ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या SUV सोबत कोणताही फायनान्स प्लॅन किंवा कर्ज उपलब्ध होणार नाही.

Used Mahindra Thar वर तिसरी ऑफर CARTRADE वेबसाइटवरून घेतली गेली आहे जिथे या SUV चे २०१६ चे मॉडेल लिस्ट केले गेले आहे. या एसयूव्हीची किंमत ५.५ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या SUV सोबत कोणत्याही प्रकारची कोणताही फायनान्स प्लॅन किंवा कर्ज उपलब्ध होणार नाही.

महिंद्र थारच्या सेकंड हँड मॉडेल्सवर उपलब्ध असलेल्या या ऑफर्सचे तपशील वाचल्यानंतर तुम्हाला या एसयूव्हीबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर त्याचे इंजिन, मायलेज आणि फीचर्सची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.

महिंद्रा थारच्या २०१६ च्या मॉडेलचे इंजिन आणि ट्रान्समिशनबद्दल बोलायचे झाल्यास, यात २५२३ cc 4-सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन ६३ bhp पॉवर आणि १८२.५ Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

महिंद्रा थारच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की एसयूव्ही १६.५५ kmpl चा मायलेज देते. हे मायलेज ARAI प्रमाणित आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मारुती सुझुकीच्या ‘या’ गाड्यांवर मिळतेय ६० हजारांपर्यंतची मोठी सूट; पाहा यादी

संबंधित बातम्या

सीएनजी कार घेण्यापूर्वी वाचा ही यादी; ‘या’ ६ कार्स ठरू शकतात उत्तम पर्याय, किंमतही १० लाखांच्या आत
Electric Scooter: हटके इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करताय, ‘या’ तीन स्कूटरचे दमदार फीचर्स पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!
Petrol-Diesel Price Today: तेल कंपन्यांकडून आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी; तपासा आजचा भाव
विश्लेषण : २०३० पर्यंत भारतात विकली गेलेली ३०% हुन जास्त वाहने इलेक्ट्रिक असतील; संशोधनाचा निष्कर्ष
FIFA World Cup 2022: मेस्सीच्या अर्जेंटिनाला हरवणाऱ्या ‘या’ फुटबॉलपटुंना १० कोटीची कार बक्षीस; फीचर्स ऐकाल तर..

व्हिडिओ

ताज्या बातम्या
ही ‘राज’नीती मुंबईत कशी जिंकणार?
“जर मी आक्रमक झालो तर त्याला..”, IND vs NZ आधी अर्शदीप सिंगचं उमरान मलिकबाबत मोठं विधान
“काश्मीर फाईल्स व्हल्गर आणि प्रचारकी”, ज्युरींच्या विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रया, म्हणाले “चित्रपटात एका पक्षाचा…”
Loksatta Adda: शाळा कॉलेजातील धमाल किस्से अन्…; ‘बालभारती’ चित्रपटाच्या कलाकारांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
मुंबई: एमसीएच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाचा नकार