Shikhar Dhawan’s Car Collection : भारतीय क्रिकेट संघाचा अव्वल फलंदाज शिखर धवन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. या ३७ वर्षीय खेळाडूने २०१० मध्ये भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले. क्रिकेटमध्ये आपले कौशल्य दाखविणाऱ्या शिखर धवनला गाड्यांची खूप आवड आहे आणि त्यामुळेच त्याच्या गॅरेजमध्ये बीएमडब्ल्यूपासून रेंज रोव्हरपर्यंतच्या आलिशान गाड्या उभ्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धवन या गाड्यांमधून अनेकदा फिरतानादेखील दिसला. जाणून घेऊ त्याच्या याच कार कलेक्शनबद्दल…

पाहा शिखर धवनचे कार कलेक्शन (Shikhar Dhawan Car Collection)

मर्सिडीज-बेंझ जीएलएस (Mercedes-Benz GLS)

शिखर धवनजवळ मर्सिडीज-बेंझ जीएलएस एसयूव्ही कार आहे. या कारची किंमत जवळपास एक कोटी २९ लाख इतकी आहे. धवनकडे या कारचे खास एडिशन आहे; ज्याची सेफ्टीपासून अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, सहा एअरबॅग्स आणि अनेक अॅडव्हान्स फीचर्स आहेत. शिखर अनेकदा ही कार चालविताना दिसतो. त्याचा लांब व्हीलबेस रस्त्यावर कार चालविताना आरामदायी अनुभव देतो. शिखरकडे जीएलएसची कोणती एडिशन आहे याबद्दलची माहिती उपलब्ध नाही. पण, ती मर्सिडीज बेंझच्या सर्वोत्तम कारपैकी एक आहे.

रेंज रोव्हर वेलार (Range Rover Velar)

रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफीसह शिखर धवनच्या गॅरेजमध्ये रेंज रोव्हर वेलारदेखील आहे. धवन मुंबईत अनेकदा या कारमधून फिरताना दिसला आहे. वेलारची स्टार्टडिंग किंमत ८९.४१ लाख रुपये आहे. वेलार या गाडीला दोन इंजिन ऑप्शन आहेत. त्यामध्ये पहिले इंजिन 2.0 लिटर पेट्रोल आणि दुसरे 2.0-लिटर डिझेल इंजिन आहे. टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्स या दोन्ही इंजिनांशी जोडलेला आहे. या एसयूव्हीमध्ये अनेक अप्रतिम फीचर्स पाहायला मिळतात. त्यात दमदार सेफ्टी फीचर्सदेखील आहेत.

बीएमडब्यू एम8 (BMW M8)

नुकतीच शिखर धवनने नवीन BMW M8 लक्झरी कार खरेदी केली आहे; ज्याची एक्स-शोरूम किंमत २.४४ कोटी रुपये आहे. त्यात पॉवरसाठी ४.४.लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिन आहे; जे ५९१ bhp पॉवर आणि ७५० Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते. या कारचा टॉप स्पीड २४९ किलोमीटर प्रतितास आहे. गाडी फक्त तीन सेकंदांत ० ते १०० किलोमीटर प्रतितास वेग घेते. BMW M8 च्या सीट अतिशय आरामदायी आहेत. शिखर लाँग ड्राइव्हसाठी ही कार वापरतो.

रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी (Range Rover Autobiography)

शिखर धवनकडे रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफीसारखी शानदार लक्झरी एसयूव्हीदेखील आहे. या SUV ची किंमत ८९.४१ लाख रुपयांपासून सुरू होते. त्यात तीन इंजिनांचा पर्याय आहे; ज्यात 3.0-लिटर पेट्रोल इंजिन, दुसरे इंजिन 3.0-लिटर डिझेल व तिसरे इंजिन ४.४ लिटर ट्विन-टर्बो V8 आहे. सर्व इंजिने 48-V माइल्ड हायब्रिडसह सुसज्ज आहेत. त्यात 8 फील्ड सिलेक्शन मोडसह टेरेन रिस्पॉन्स 2 सिस्टीम आहे, ज्याच्या मदतीने ही कार ऑफ-रोड नेण्यात कोणतीही अडचण येत नाही.

फीचर्सबद्दल बोलायचे झाले, तर यात १३.१ इंच इन्फोटेन्मेंट सिस्टीम आहे. याशिवाय यात हीटिंग, कूलिंग आणि मसाजची सुविधाही उपलब्ध आहे. एसयूव्हीला पावर देण्यासाठी ३ इंजिनांचा पर्याय देण्यात आला आहे. पहिल्या इंजिनामध्ये ३.० लिटर पेट्रोल, दुसरे ३.०-लिटर डिझेल इंजिन व तिसऱ्या इंजिनामध्ये रेंज-टॉपिंग ४.४-लिटर ट्विन-टर्बो V8 समाविष्ट आहे.

सर्व इंजिनांचे पर्याय 48-V माइल्ड हायब्रिड मोटरशी जोडलेले आहेत. ऑटोबायोग्राफी प्रत्येक प्रकारे एक लँड रोव्हर आहे. कारण- त्याला कार निर्मात्याची टेरेन रिस्पॉन्स 2 सिस्टीम आठ फील्ड निवडण्यायोग्य मोडसह मिळते, जी लक्झरी एसयूव्ही ऑफ-रोड घेण्यास सक्षम आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shikhar dhawans cars collection indian cricketer shikhar dhawan owned 4 most expensive cars sjr