Simple Energy EV: जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर थोडी वाट पाहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. महागड्या पेट्रोलला मात देण्यासाठी भारतीय स्टार्टअप कंपनी सिंपल एनर्जी पुढील महिन्यात आपली ई-स्कूटर लाँच करणार आहे. टू-व्हीलर इलेक्ट्रिक वाहन कंपनी सिंपल एनर्जीने सांगितले की, ती पुढील महिन्यात आपली पहिली ई-स्कूटर ‘सिंपल वन’ (Simple One) बाजारात आणणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कंपनीने आपली पहिली ई-स्कूटर लाँच करण्याची घोषणा केली असली तरी ही स्कूटर कधीपर्यंत बाजारात येईल, याचा खुलासा कंपनीने केलेला नाही. या वाहनाचा पुरवठा कधी सुरू होणार याबाबत कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही. सिंपल एनर्जीने गेल्या वर्षी आपली ई-स्कूटर लाँच करण्याची घोषणा केली होती. परंतु काही उत्पादन समस्यांमुळे उत्पादन लाँच होऊ शकले नाही. यापूर्वी देखील, EV स्टार्टअप सिंपल एनर्जीने पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल केले होते.

(हे ही वाचा : तुमच्या बाईकमध्ये ‘किकस्टार्ट’ सिस्टम का येत नाहीये माहितेय कां? ‘हे’ आहे यामागील खरं कारण )

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, स्कूटरची डिलिव्हरी मार्च तिमाहीत होईल असे सांगितले होते. सिंपल एनर्जीने एका निवेदनात म्हटले आहे की, “सिंपल वन २३ मे रोजी बेंगळुरूमध्ये लाँच होईल. यासोबतच कंपनीला भारतातील दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत खळबळ माजवायची आहे. मात्र, ग्राहकांना स्कूटर कधीपासून मिळू शकतील, याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.

Simple One electric scooter रेंज

कंपनीच्या स्कूटरबद्दल बोलायचे झाले तर, ती एका चार्जमध्ये २३६ किलोमीटरपर्यंत चालवता येते. यामध्ये कंपनीकडून ४.८KWH बॅटरी उपलब्ध आहे. तसेच, त्यातील मोटर ८.५ kW च्या पॉवरसह ७२ न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करू शकते. स्कूटरला शून्य ते ४० किलोमीटरचा वेग येण्यासाठी फक्त २.७७ सेकंद लागतात आणि तिचा वेग ताशी १०५ किलोमीटर आहे.

Simple One electric scooter किंमत

सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरसाठी देशभरातून एक लाखाहून अधिक बुकिंग्स मिळाल्याची माहिती कंपनीने वर्षाच्या सुरुवातीला दिली होती. हे अद्याप कंपनीने लाँच केलेले नाही, परंतु कंपनी भारतीय बाजारात १ लाख ते १.५ लाख रुपयांच्या दरम्यान लाँच करू शकते अशी अपेक्षा आहे. कंपनी सध्या स्कूटरसाठी बुकिंग घेत आहे आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ती १,९४७ रुपयांमध्ये बुक केली जाऊ शकते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Simple energy has announced the launch date for its electric two wheeler the simple one the launch is scheduled for 23 may 2023 in bangalore pdb