देशात एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सचे वर्चस्व कायम आहे. अशात टाटाने आपल्या नेक्सॉन वाहनाचे काही व्हेरिएंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नेक्सॉन ही ह्युंडाई व्हेन्यू, किया सॉनेट, आणि महिंद्रा एक्सयूव्ही ३०० या वाहनांना टक्कर देते. कंपनीने या वाहनाचे ६ व्हेरिएंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाहनाची किंमत ७.६० लाखांपासून सुरू होते.
टाटाने एक्स झेड, एक्स झेड ए, एक्स झेड + (ओ), एक्स झेड ए + (ओ), एक्स झेड + (ओ) डार्क आणि एक्स झेड ए + (ओ) या व्हेरिएंटची विक्री बंद केली आहे. या व्हेरिएंट्सना पर्याय म्हणून कंपनी एक्स झेड + (एच एस), एक्स झेड + (एल) आणि एक्स झेड + (पी) देण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र, डार्क, काझीरंगा आणि इतर व्हेरिएंट विक्रीसाठी बाजारात उपलब्ध असतील.
(आनंदाची बातमी! केवळ ४ लाखांमध्ये मिळत आहे MAHINDRA THAR, जाणून घ्या ऑफर)
टाटा नेक्सॉनचे फीचर
कारमध्ये टच स्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, कुल्ड स्टोअरेज कन्सोल, पूश बटन स्टार्ट, कनेक्टेड कार टेक इत्यादी फीचर मिळतात. त्याचबरोबर, सुरक्षेबाबत बोलायचे झाल्यास, ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये या कारला ५ स्टार रेटिंग मिळालेली आहे.
टाटा नेक्सॉनच्या पुढील पिढीच्या मॉडेलवर काम करत असल्याचे देखील मानले जात आहे. हे मॉडेल टाटा नेक्सॉनच्या एएलएफए प्लाटफॉर्मवर आधारित असेल. कारच्या डिजाईनमध्ये सुधारणा केली जाईल, ज्यामध्ये अद्ययावत केबिन आणि भिन्न पावरट्रेन असेल. हे मॉडेल ऑटो एक्सपो २०२३ मध्ये टाटा सफारी फेसलिफ्ट आणि हॅरिअर फेसलिफ्टबरोबर प्रदिर्शित होऊ शकते.