टाटा टियागो ही कंपनीची सर्वात स्वस्त कार आहे. याची बाजारात मारुती स्विफ्टशी स्पर्धा आहे. तथापि, विक्रीच्या बाबतीत स्विफ्ट खूप पुढे आहे, जून २०२३ मध्ये ती दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे तर सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये टाटा टियागो सतराव्या क्रमांकावर आहे. पण, जून २०२३ मध्ये, Tiago ने वार्षिक आधारावर विक्री वाढीच्या दराच्या बाबतीत स्विफ्टला मागे टाकले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या महिन्यात म्हणजे जून २०२३ मध्ये मारुती स्विफ्टच्या एकूण १५,९५५ युनिट्सची विक्री झाली आहे, जी जून २०२२ मध्ये विकल्या गेलेल्या १६,२१३ युनिट्सपेक्षा सुमारे २ टक्के कमी आहे. दुसरीकडे, टाटा टियागो आहे, ज्याने जून २०२३ मध्ये ८,१३५ युनिट्सची विक्री केली आहे, जी जून २०२२ मध्ये विकल्या गेलेल्या ५,३१० युनिट्सपेक्षा ५३ टक्के जास्त आहे.

(हे ही वाचा : Tata Tigor अन् Hyundai Creta ची जोरदार टक्कर, सेफ्टीमध्ये कुठली ठरली वरचढ? )

यावरून हे स्पष्ट होते की, मारुती सुझुकी स्विफ्ट व्हॉल्यूमच्या बाबतीत पुढे आहे परंतु वार्षिक आधारावर विक्री वाढीच्या दृष्टिकोनातून टाटा टियागो पुढे गेली आहे. एकीकडे, स्विफ्टची विक्री वार्षिक आधारावर सुमारे २ टक्क्यांनी कमी झाली आहे, तर दुसरीकडे, टियागोची विक्री वार्षिक आधारावर ५३ टक्क्यांनी वाढली आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata tiago sold 8135 in june 2023 which has resulted in 0 02 percent mom growth pdb