Safest car in India: कार खरेदी करताना सेफ्टी फीचर्स खूप महत्वाचे असतात. हल्ली लोकांकडून वाहनांमध्ये अधिकाधिक सेफ्टी फीचर्सची मागणी केली जात आहे. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्या देखील वाहनांच्या सुरक्षिततेची अधिक काळजी घेऊ लागल्या आहेत. कारच्या स्टाइल आणि पॉवरसोबतच आता कारच्या सेफ्टी फीचर्सवरही खास लक्ष देण्यात येत आहे. नव्या तंत्रासोबत कार्समध्ये नवीन सेफ्टी फीचर्स दिले जात आहेत. तुम्हीही एबीएस, एअरबॅग्स किंवा सेंट्रल लॉकिंग सिस्टमसारखे सेफ्टी फीचर्सची नावे ऐकली असतीलच. दरम्यान, कोणती कार सुरक्षित आहे, हे NCAP च्या क्रॅश टेस्टमधून समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुरक्षित गाड्यांचा विचार केला तर आतापर्यंत टाटाच्या तीन गाड्या बाजारात राज्य करत होत्या. Tata Punch, Nexon आणि Altroz ​​या कार सुरक्षित कार म्हणून ओळखल्या जात होत्या. या कार्सना ग्लोबल NCAP सुरक्षा चाचणीत ५ स्टार रेटिंग मिळाले होते. यानंतर लोकांना या गाड्या मनापासून आवडल्या आणि त्यांची विक्रीही वाढली. विशेषत: पंच आणि नेक्सानने मायक्रो एसयूव्ही आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये त्यांची क्षमता दाखवली आणि टॉप १० विकल्या जाणाऱ्या कारमध्ये स्थान मिळवले. पण नुकत्याच आलेल्या एका अहवालाने सगळंच बदलून टाकलं. आता इतर वाहनांनी देशात विकल्या जाणाऱ्या टॉप ५ सुरक्षित कारच्या यादीत स्थान मिळवले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या यादीत आता टाटाची एकही कार स्थान मिळवू शकलेली नाहीये. महिंद्रा या देशी कंपनीची केवळ एक एसयूव्ही या यादीत स्थान मिळवू शकली आहे.

(हे ही वाचा : भारतातील सर्वात सुरक्षित कार कोणती माहितेय का? तुमच्या फॅमिलीसाठी एकदम ‘परफेक्ट’ आहे ‘ही’ गाडी )

ग्लोबल एनसीएपीच्या टॉप ५ यादीमध्ये टाटा कारला स्थान न मिळाल्याशिवाय, अलीकडील लॅटिन एनसीएपी रेटिंगमध्ये आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली ती म्हणजे हॅचबॅक सेगमेंटमध्ये, फ्रेंच कार निर्माता सिट्रोएनची C3 कार जी लोकांना खूप आवडत होती. याला शून्य सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. त्याच वेळी, लोकप्रिय कंपनी जीपच्या रेनेगेडला जगभरातील त्यांच्या एसयूव्हीसाठी १ स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले.

काही नियमांमध्ये झाला बदल

ग्लोबल NCAP ने त्याचे काही टेस्टिंग प्रोटोकॉल बदलले आहेत ज्यानंतर ज्या कार पूर्वी ५ स्टार रेटिंग श्रेणीमध्ये ठेवल्या होत्या त्या आता बाहेर पडल्या आहेत. नियमांमध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत याची माहिती देण्यात आली नसली तरी ते आणखी कडक करण्यात आले आहेत हे मात्र निश्चित. स्केल उत्तीर्ण करण्यासाठी काही गुण वाढवले ​​गेले आहेत आणि आता कारना अनेक चाचण्यांमधून जावे लागेल आणि रँक मिळविण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त क्रमांक मिळवावे लागतील.

ज्या कारमध्ये फॉक्सवॅगन व्हरटसने टॉप ५ मध्ये पहिले स्थान मिळवले आहे. प्रौढांच्या सुरक्षेमध्ये या कारला ५ स्टार रेटिंग मिळाले आहे. त्याच वेळी, कारला चाइल्ड सेफ्टीमध्ये ५ स्टार रेटिंग देखील मिळाले आहे. कारने ८३ पैकी ७१.७१ गुण मिळवले आहेत.

स्कोडाची स्लाव्हिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. याला बाल आणि प्रौढांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ५ स्टार रेटिंग देखील मिळाले आहे. या कारने देखील Virtus प्रमाणेच ७१.७१ गुण मिळवले आहेत.

फोक्सवॅगनच्या कारने पुन्हा तिसर्‍या क्रमांकावर आपली पकड कायम ठेवली असून ती Volkswagen Tiguan ठरली आहे. Tiguan ला प्रौढ आणि मुलांच्या सुरक्षेसाठी ५ स्टार रेटिंग मिळाले आहे. तथापि, पहिल्या दोन कारच्या तुलनेत या कारला थोडे कमी गुण मिळाले आहेत. ७१.६४ गुण मिळाले आहेत.


मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is not a single tata car in the list of top 5 safe cars in global ncaps crash test rating pdb