tips to avoid black smoke from vehicle | Loksatta

वाहनातून निघणाऱ्या काळ्या धुराच्या समस्येला गांभीर्याने घ्या, ‘हे’ करा, अन्यथा होईल मोठे नुकसान

अनेदा रस्त्यांवर काही वाहने काळा धूर सोडताना दिसून येतात. हा काळा धूर आरोग्याला तर धोकादायक आहेच, सोबतच ते पर्यावरणासाठी धोकादायक आहे. वाहनातून काळा धूर निघू नये यासाठी पुढे काही टीप्स देण्यात आल्या आहेत. त्याने ही समस्या दूर होऊ शकते.

वाहनातून निघणाऱ्या काळ्या धुराच्या समस्येला गांभीर्याने घ्या, ‘हे’ करा, अन्यथा होईल मोठे नुकसान
संग्रहित छायाचित्र

अनेकदा रस्त्यांवर काही वाहने काळा धूर सोडताना दिसून येतात. हा धूर आरोग्याला तर धोकादायक आहेच, सोबतच ते पर्यावरणासाठी धोकादायक आहे. कार चालकही या बाबीकडे दुर्लक्ष करतात. मात्र या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास मोठे नुकसान होऊ शकते. वाहनातून काळा धूर निघण्याची समस्या ही कारमधील इंजिनच्या सिलिंडरमधील हवा आणि इधनाच्या प्रमाणातील गडबडीमुळे उद्भवते.

ही समस्या डिझेल वाहनामध्ये अधिक दिसून येते. वाहन जुने झाल्याने, तसेच अधिक वजनासह प्रवास केल्याने वाहनातून काळा धूर निघतो. अधिक वजनामुळे वाहनाच्या इंजिनवर अधिक ताण पडतो. त्यामुळे ही समस्या होते.

(वाहतुकीचा नियम चुकून तोडलाय? चालान जारी झाले की नाही याबाबत जाणून घेण्यासाठी ‘हे’ करा)

काळा धूर निघण्याची समस्या दूर करण्यासाठी हे करा

१) नियमित इंजिन ऑईल बदला

कारचे इंजिन ऑईल बदलत राहा. टाकलेले ऑईल अधिक काळ वापरू नका. याने इंजिनची क्षमता कमी होते. ही समस्या होऊ नये यासाठी इंजिन ऑईल बदलत राहा.

२) कारची नियमित सर्व्हिसिंग करा

कारची ठरलेल्या वेळी सर्व्हिसिंग करा. अन्यथा इंजिन खराब होऊ शकते आणि त्याची क्षमता कमी होऊ शकते आणि नंतर कार काळा धूर सोडते.

(बहुप्रतीक्षित BMW XM ग्राहकांसाठी सादर, पेट्रोल – इलेक्ट्रिक दोन्हीवर चालते, इलेक्ट्रिक मोडवर देते इतकी रेंज)

३) बिघाड झालेले भाग तातडीने बदला

जर वाहनातून काळा धूर निघत असेल तर त्यास तातडीने मेकॅनिकला दाखवा आणि बिघाड झालेले भाग बदलून टाका. अन्यथा एक भाग खराब झाल्यानंतर वाहनाचे इतर भागही हळू हळू खराब होतात. ते दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला नंतर अधिक पैसे खर्च करावे लागू शकतात. त्यामुळे आधीच मेकॅनिकला समस्या दाखवा.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अरे वा! ‘या’ कंपन्या देत आहेत आपल्या दुचाकीवर खास फेस्टिव्ह ऑफर; जाणून घ्या एका क्लिकवर…

संबंधित बातम्या

Tata Motors December 2022 discounts: ‘या’ कारवर मिळतेय दमदार सूट; होणार ६५ हजारांची बचत
२० सेकंदात बाईकचा स्पीड १६ kmph वरुन ११४ kmph वर गेला अन् दोघांचा मृत्यू झाला; धक्कादायक घटनाक्रम हेल्मेट कॅमेरात कैद
वर्ष २०२२ मध्ये ‘या’ नव्या इलेक्ट्रिक बाइक्स वेटिंगमध्ये; सिंगल चार्जमध्ये २५० किमीपर्यंत अंतर कापणार
पाच तासांत फडणवीस-शिंदेंचा ५३० किमी प्रवास; ‘समृद्धी महामार्गा’वर स्पीड लिमिट किती? सर्वसामान्यांना या वेगाने जाता येणार?
Car Discount Offers: वाहन प्रेमींसाठी आनंदाची बातमी! अर्ध्या किमतीत मिळतेय ‘ही’ लोकप्रिय कार; लगेच पाहा कुठे मिळतेय ही विशेष ऑफर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
महापरिनिर्वाण दिनी राज्यपालांकडून बाबासाहेबांना अभिवादन; म्हणाले, “बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच…”
अर्जुन कपूरशी लग्न आणि आई होण्याबाबत मलायकाने सोडलं मौन; म्हणाली, “या काल्पनिक गोष्टी…”
Morbi bridge Collapse: TMC चे प्रवक्ते साकेत गोखले यांना गुजरात पोलिसांकडून अटक, पक्षाच्या खासदाराचं ट्वीट
राणादा-पाठकबाईंच्या रिसेप्शन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन आला अन्…; हार्दिक-अक्षयाच्या लग्नातील व्हिडीओ व्हायरल
प्रो कब्बडी लीग २०२२: माजी चॅम्पियन पटना पायरेट्सचा धुव्वा उडवत पुणेरी पलटण उपांत्य फेरीत