Top 10 Best Selling SUVs October 2023: भारतात SUV ची मागणी सातत्याने वाढत आहे. वाढत्या मागणीमुळे अनेक कार उत्पादक कंपन्या या सेगमेंटमध्ये विस्तार करत आहेत. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्युंदाई आणि महिंद्राच्या अनेक एसयूव्हींना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये सर्वाधिक विक्री होणारी SUV ही Tata Nexon होती. या कारनं ब्रेझा, पंच आणि क्रेटा सारख्या सर्व एसयूव्हींना मागे टाकलं आहे.
सर्वाधिक विक्री होणारी SUV
- Tata Nexon ने ऑक्टोबर २०२३ मध्ये १८,८८७ युनिट्सची विक्री केली तर ऑक्टोबर २०२२ मध्ये १३,७६७ युनिट्सची विक्री झाली. त्याची विक्री वार्षिक आधारावर २३ टक्क्यांनी वाढली आहे.
- मारुती ब्रेझाने ऑक्टोबर २०२३ मध्ये १६,०५० युनिट्सची विक्री केली तर ऑक्टोबर २०२२ मध्ये ९,९४१ युनिट्सची विक्री झाली. त्याची विक्री वार्षिक आधारावर ६१ टक्क्यांनी वाढली आहे.
- टाटा पंचने ऑक्टोबर २०२३ मध्ये १५,३१७ युनिट्सची विक्री केली तर ऑक्टोबर २०२२ मध्ये १०,९८२ युनिट्सची विक्री झाली. त्याची विक्री वार्षिक आधारावर ३९ टक्क्यांनी वाढली आहे.
(हे ही वाचा : Royal Enfield ची सर्वात स्वस्त बुलेट बंद? आता ग्राहकांकडे कोणता पर्याय? )
- महिंद्रा स्कॉर्पिओने ऑक्टोबर २०२३ मध्ये १३,५७८ युनिट्स विकल्या, तर ऑक्टोबर २०२२ मध्ये ७,४३८ युनिट्स विकल्या गेल्या. त्याची विक्री वार्षिक आधारावर ८३ टक्क्यांनी वाढली आहे.
- Hyundai Creta ने ऑक्टोबर २०२३ मध्ये १३,०७७ युनिट्सची विक्री केली तर ऑक्टोबर २०२२ मध्ये ११,८८० युनिट्सची विक्री झाली. त्याची विक्री वार्षिक आधारावर १० टक्क्यांनी वाढली आहे.
ऑक्टोबर २०२३ मध्ये, Kia Seltos (१२,३६२ युनिट्स) सहाव्या स्थानावर आहे, Hyundai Venue सातव्या स्थानावर (११,५८१ युनिट) आहे, Maruti Suzuki Fronx आठव्या स्थानावर (११,३५७ युनिट्स) आहे, मारुती Grand Vitara नवव्या स्थानावर (१०,८३४ युनिट्स) आहे, महिंद्रा बोलेरो दहाव्या (९,६४७ युनिट्स) स्थानावर आहे.