देशातील टू व्हीलर क्षेत्रातील बाइक सेगमेंटमध्ये कमी किमतीत मोठी मायलेज देणार्या बाईक्सची संख्या मोठी आहे. यामध्ये बजाज, हिरो, टीव्हीएस, सुझुकी आणि होंडा यांसारख्या कंपन्यांच्या बाईक्स सर्वाधिक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जर तुम्हाला कमीत कमी किमतीत जास्त मायलेज देणारी बाईक खरेदी करायची असेल, तर तुम्ही सर्वात कमी किमतीत जास्तीत जास्त मायलेज देणाऱ्या टॉप 3 बाईकची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता, ज्यात त्यांची किंमत, मायलेज, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सचा समावेश आहे.

Hero HF 100: ही बाईक सेगमेंटमधील सर्वात कमी किंमतीची बाईक आहे जी तिच्या किंमती आणि मायलेजसाठी पसंत केली जाते. कंपनीने या बाईकचा एकच व्हेरिएंट बाजारात आणला आहे.

बाईकमध्ये ९७.२ cc चे सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन ८.३६ PS पॉवर आणि ८.०५ Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ४ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

आणखी वाचा : स्पोर्ट्स बाईक घ्यायचीय? पण बजेट कमी आहे, मग KTM RC 390 फक्त १ लाखात घ्या, वाचा संपूर्ण ऑफर

बाईकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही बाईक ८३ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते. हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. Hero HF 100 ची किंमत ५१,४५० रूपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते जी ऑन रोड ६३,०५१ रूपयांपर्यंत जाते.

Hero HF Deluxe : ही या सेगमेंटमधली दुसरी सर्वात कमी किमतीची बाईक आहे, ज्याचे चार व्हेरिएंट कंपनीने बाजारात लॉंच केले आहेत.
या बाईकमध्ये सिंगल सिलेंडर ९२.२ सीसी इंजिन आहे. हे इंजिन ८.०२ PS ची कमाल पॉवर आणि ८.०५ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ४ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

बाईकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही Hero HF Deluxe 83 kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. Hero HF डिलक्सची किंमत ५६,०७० रूपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते जी ऑन रोड ६८,०३५ रूपयांपर्यंत जाते.

Bajaj CT 110: बजाज CT 110 बाईक ही या यादीतील तिच्या कंपनीची तिसरी आणि सर्वात स्वस्त बाईक आहे, ज्याचे दोन व्हेरिएंट कंपनीने बाजारात लॉंच केले आहेत.

आणखी वाचा : मोठं कुटुंब आणि बजेट छोटं आहे? मग ४ लाखांपेक्षा कमी किमतीत घ्या Maruti Ertiga

बाईकमध्ये ११५ सीसीचे सिंगल सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन ८.६ PS पॉवर आणि ९.८१ Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. बाईकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही बाईक १०४ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. Bajaj CT 110 ची सुरुवातीची किंमत ५९,१०४ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी ऑन रोड असताना ७१,७५५ रुपयांपर्यंत जाते.

More Stories onऑटोAuto
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top 3 best cheapest bikes in india hero hf 100 hf deluxe bajaj ct 110 read price engine and mileage details prp
First published on: 27-06-2022 at 18:28 IST