टोयोटाच्या कारला बाजरात मोठी मागणी आहे. टोयोटाने अलीकडेच आपली नवीन Toyota MPV Rumion लाँच केली आहे. लाँच होताच कंपनीने याचे बुकिंग सुरू केले होते. मात्र, आता कंपनीने त्याचे बुकिंग बंद केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या नवीन कारच्या मोठ्या प्रमाणात बुकिंगमुळे कारचा बॅकलॉग वाढत होता, ज्याला थांबवण्यासाठी कंपनीने तात्पुरते बुकिंग थांबवले आहे. बॅकलॉग वाढल्यामुळे कंपनीला कार डिलिव्हरी करण्यासाठी जास्त वेळ लागतो. ज्याला थांबवण्यासाठी कंपनीने तात्पुरते बुकिंग थांबवले आहे. बॅकलॉग वाढल्यामुळे कंपनीला कार डिलिव्हरी करण्यासाठी जास्त वेळ लागतोय, अशी माहिती कंपनीने दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Rumion चे बुकिंग बंद झाले असले तरी ग्राहकांना त्याचे पेट्रोल व्हेरियंट बुक करता येणार आहे. Toyota Rumion ही मारुती एर्टिगाची रीबॅज केलेली आवृत्ती आहे. कंपनीने या कारमध्ये अनेक बदल केले असले तरी तुम्हाला त्याच्या डिझाईनमध्ये Ertiga ची झलक पाहायला मिळेल. कंपनीने त्याचे फ्रंट ग्रिल इनोव्हा हाय क्रॉस सारखे डिझाइन केले आहे, ज्यामुळे MPV चा फ्रंट लुक नवीन दिसत आहे. Toyota Rumion चे हेडलाइट, टेल लाईट, साइड आणि रियर डिझाईन मारुती एर्टिगा पासून प्रेरित आहे.

(हे ही वाचा : ५.९९ लाखाच्या ‘या’ मारुती कारनं ग्राहकांना लावलं वेड, छप्परफाड विक्रीमुळे वेटिंग पीरियड पोहोचला ‘इतक्या’ महिन्यांवर )

इंजिन आणि गिअरबॉक्स

Toyota Rumion १.५ लीटर पेट्रोल इंजिनमध्ये लाँच करण्यात आली आहे. हे इंजिन १०४PS पॉवर आणि १३८Nm टॉर्क जनरेट करते. यात ५-स्पीड मॅन्युअल आणि ४-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही MPV २०.५kmpl मायलेज देऊ शकते.

वैशिष्ट्ये

Rumion MPV मध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, हिल होल्ड, व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल (VSC) आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकरसह ८-इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आहे.

किंमत

कंपनीने या कारची किंमत १०.२९ लाख ते १३.६८ लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान ठेवली आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toyota has announced that it has decided to temporarily halt bookings for the new rumion e cng variant in the country pdb