इंडिया यामाहा मोटर इंडियाने (IYM) ‘द कॉल ऑफ द ब्ल्यू’ ब्रॅण्ड मोहिमेंतर्गत तीन दुचाकींसाठी नवीन, आकर्षक अपडेट्स सादर केली आहेत. एमटी-१५ व्ही२ (MT-15 V2), फॅसिनो व रे झेडआर (Ray ZR) अशी या मॉडेल्सची नावे आहेत. भारतातील ग्राहकांसाठी विशेषत: तरुणांसाठी कंपनीने तिन्ही मॉडेल्समध्ये रंग पर्याय आणि सुरक्षा फीचर्सदेखील दिले आहेत.

MT 15 V2 ही एक पॉवर 155cc लिक्विड कूल्ड 4-व्हॉल्व्ह इंजिन असलेली डायनॅमिक स्ट्रीट फायटर मोटरसायकल आहे; जिने भारतीय बाजारपेठेत स्वतःची अनोखी छाप पाडली आहे. ही मोटरसायकल राईडसाठी पुरेशी पॉवर आणि टॉर्क प्रदान करते. तसेच MT-15 V2 हे ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम, ड्युअल चॅनल एबीएस, अपसाइड डाउन फ्रंट फोर्क्स, ॲल्युमिनियम स्विंगआर्म व व्हेरिएबल व्हॉल्व्ह ऍक्च्युएशन (VVA) यांसारख्या प्रगत फीचर्सनी सुसज्ज आहे.

हेही वाचा…Baleno, Brezza, Nexon, Creta नव्हे तर ‘या’ ५.५४ लाखाच्या हॅचबॅक कारसाठी ग्राहकांच्या लागल्या रांगा, झाली तुफान विक्री

MT-15 प्रेमींसाठी कंपनीने आकर्षक सायबर ग्रीन कलर पर्यायाचे दिले आहेत. त्याशिवाय दुचाकी अधिक आकर्षक बनविण्यासाठी सायन स्टॉर्म डीएलएक्स कलर स्कीममध्ये काही ग्राफिकल बदल करण्यात आले आहेत. त्याव्यतिरिक्त यामध्ये हॅझार्ड लाइट फंक्शन देण्यात आले आहे. या फंक्शनमध्ये वाहन फ्लॅशच्या चारही इंडिकेटरचा धुक्याच्या काळात वापर केला जातो. त्याशिवाय ग्राहकांना या बाईकमध्ये डार्क मॅट ब्ल्यू, मेटॅलिक ब्लॅक, आइस फ्लू व्हर्मिलियन, रेसिंग ब्ल्यू व मेटॅलिक ब्लॅक हे पर्याय उपलब्ध असतील.

फॅसिनो 125 Fi Hybrid लाइनअपला सध्याच्या डार्क मॅट ब्ल्यू, कूल ब्ल्यू मेटॅलिक आणि डिस्क आणिव ड्रम व्हेरियंटसाठी (Disc & Drum variant) नवीन सायन ब्ल्यू, मॅट कॉपर, सिल्व्हर, मेटॅलिक व्हाईट कलर स्कीम्स असे रंग पर्याय सादर केले आहेत. त्याव्यतिरिक्त फॅसिनोमधील ड्रम व्हेरिएंटला सर्व नवीन मेटॅलिक ब्लॅक शेड पर्याय देण्यात आला आहे.

फीचर्स –

दोन्ही दुचाकी मॉडेल्समध्ये BS VI OBD2 व E-20 फ्युएल कंप्लायंट, एअर कूल्ड, फ्युएल इंजेक्टेड (FI), 125 cc ब्ल्यू कोअर इंजिन हायब्रिड पॉवर असिस्ट फीचर्स देण्यात आले आहेत. त्यात इंधन बचत, ऑटोमॅटिक स्टॉप , स्टार्ट सिस्टीम, स्मार्ट मोटर जनरेटर, एलईडी बल्ब, Y कॉन्टॅक्ट ब्लूटूथ्स, डिजिटल मीटर कन्सोल आदी अनेक आधुनिक रायडिंग अनुभव देणारी फीचर्स देण्यात आली आहेत.

किंमत –

१. एमटी-१५ व्ही२ (MT-15 V2) – डीएलएक्स सायबर ग्रीन- १,७२, ७०० रुपये.

२. फॅसिनो १२५ एफआय हायब्रिड (Fascino 125 Fi Hybrid) – डिस्क व्हेरिएंट – मॅट कॉपर, मेटॅलिक व्हाइट, Cyan ब्ल्यू, सिल्व्हर – ९१,१३० रुपये.
ड्रम व्हेरिएंट – मॅट कॉपर, मेटॅलिक व्हाइट, Cyan ब्ल्यू, सिल्व्हर- ७९,९०० रुपये.
मेटॅलिक ब्लॅक ७९,१५० रुपये.

३. रे झेडआर १२५ एफआय हायब्रिड (Ray ZR 125 Fi Hybrid) डिस्क व्हेरिएंट – Cyan ब्ल्यू – ९१,४३० रुपये.
ड्रम व्हेरिएंट – Cyan ब्ल्यू – ८५,०३० रुपये.