साहित्य : रंगीत कार्डपेपर, पुठ्ठा, कात्री, गम, क्रेयॉन, काळया शाईचे पेन, पेन्सिल, कंपास इ.
कृती : ८ इंचाच्या मोठय़ा गोलाकारात साधारण एक चतुर्थाश भागात ७ इंचाचा गोल काढा. आतील गोलाकारात आठवडय़ाचे ६ वार बसवा व वेळापत्रक बनवा.
केसांसाठी ८ इंचाच्या गोलाकाराच्या वरच्या आणि मागील बाजूस काळ्या व चॉकलेटी रंगाने फराटे मारा. या केसांच्या भागात साधारण १.१ सेंमी अंतरावर डोक्यापर्यंत पट्टय़ा अर्धवट कापा व पेन्सिलने एक-एक  पट्टी आतल्या बाजूस गुंडाळून घ्या. साधारण कुरळे केस असलेल्या चेहऱ्याचे गोंडस चित्र तयार करा व गोलाकार पुठ्ठय़ावर चिकटवून घ्या. कपाटावर लावा.        

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Art corner time table