कोडिंगचं कोडं : डेटा टाइप

बहुतेक भाषांमध्ये प्रोग्राममध्ये व्हेरिएबल वापरण्याआधी ते डिक्लेअर करावं लागतं.

कोडिंगचं कोडं : डेटा टाइप

मागच्या भागात आपण व्हेरिएबलच्या वापरातील पहिला टप्पा शिकलो, व्हेरिएबल डिक्लरेशन (Variable Declaration) चा. एखादं व्हेरिएबल वापरायच्या आधी त्या प्रोग्रामला सांगायचं की, आपण अमुक एका नावाचं व्हेरिएबल वापरणार आहोत. म्हणजे, त्यानुसार कम्प्युटर त्याच्या मेमरी (memory) मध्ये एक जागा राखून ठेवतो नि त्या जागेला आपण दिलेलं नाव देतो. जेव्हा आपण त्या नावाच्या व्हेरिएबलमध्ये काही माहिती साठवायला जातो, तेव्हा ती मेमरीमधील त्या राखून ठेवलेल्या भागात साठवली जाते.

जावास्क्रिप्टसारख्या भाषांमध्ये, व्हेरिएबल डिक्लेअर करताना नुसतं ” var x;” असं व्हेरिएबलचं नाव डिक्लेअर केलं तरी पुरतं. परंतु इतर काही भाषांमध्ये, व्हेरिएबलच्या नावाबरोबर त्याचा डेटा टाइप (data type) सुद्धा डिक्लेअर करावा लागतो. व्हेरिएबलचा डेटा टाइप म्हणजे त्या व्हेरिएबलमध्ये आपण काय प्रकारची माहिती ठेवणार आहोत ते. उदाहरणार्थ, आपण त्या व्हेरिएबलमध्ये व्यक्तीचं नाव साठवून ठेवणार आहोत, की वय साठवून ठेवणार आहोत, की जन्मतारीख साठवून ठेवणार आहोत, याप्रमाणे त्याचा टाइप बदलेल.

वेगवेगळ्या भाषांमध्ये या टाइप्सची वेगवेगळी नावं असतात. उदाहरणार्थ, जावा (Java) मध्ये पूर्णाकासाठी  int, अपुर्णाकांसाठी float, मजकुरासाठी String, तारखेसाठी  java.util.Date, इत्यादी. व्हिज्युअल बेसिक (Visual Basic) मध्ये पूर्णाकासाठी Integer, अपूर्णाकासाठी Double, मजकुरासाठी String, तारखेसाठी ऊं३ी, इत्यादी. या भाषांमध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करताना नुसतं जावा स्क्रिप्ट भाषेतल्या सारखं ५ं१ लिहून पुरत नाही. त्या भाषेतील टाइपनुसार व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागतं. सोबतच्या आकृतीत याचे काही नमुने दिले आहेत.

या वेगवेगळ्या भाषांच्या वेगवेगळ्या तऱ्हांनी गोंधळून जाऊ  नका. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की :

१. बहुतेक भाषांमध्ये प्रोग्राममध्ये व्हेरिएबल वापरण्याआधी ते डिक्लेअर करावं लागतं.

२. आपण जी भाषा वापरत असू, त्या भाषेच्या पद्धतीप्रमाणे, टाइपसकट किंवा टाइपशिवाय, ते डिक्लेअर करायचं असतं.

 

हे सदर वाचून काही जणांनी मला विचारलं, ‘‘आमच्याकडे विंडोज् पी.सी. आहे. प्रोग्रामिंग करायला त्यातलं कोणतं ऑप्शन वापरायचं.’’ खरंखुरं प्रोग्रामिंग करायला आपण ज्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये प्रोग्रामिंग करणार, त्या लँग्वेजशी संबंधित काही सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल करायला लागतात. या सदरात आपण खरीखुरी प्रोग्रामिंग लँग्वेज न वापरता, लुटुपुटुची ‘ब्लॉकली’ ही भाषा वापरणार आहोत. त्यामुळे आपल्याला आणखी काही सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल करायची गरज नाही. विंडोज् पी.सी.मधील जो ब्राऊजर (browser) तुम्ही इंटरनेटवरील इतर वेबसाइट्स बघण्यासाठी वापरता (उदा. इंटरनेट एक्सप्लोरर, मोझिला फायरफॉक्स, गुगल क्रोम) तोच ब्राऊजर वापरून ‘http://www.codingbasics.omsw.co.in’ ही वेबसाइट बघा. या वेबसाइटवरील ‘हे करून बघा’ हा पर्याय वापरून तुम्ही या सदरातील उदाहरणे करून बघू शकाल.
sudomu@gmail.com

(या सदरातील उदाहरणं http://www.codingbasics.omsw.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध असतील.)

मराठीतील सर्व बालमैफल ( Balmaifalya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अब रंग  लायेगी होली..
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी