शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तोडल्याची घोषणा केल्यानंतर झालेल्या भाजपच्या पहिल्याच सभेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर शरसंधान साधले आहे. शिवसेनेला कौरवांची उपमा देत आता धर्मयुद्ध होऊनच जाऊ द्या, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रचाराचे रणशिंग फुंकले. आमची औकात काय आहे, हे २१ फेब्रुवारीला दाखवू, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हटले.
Live Updates
18:51 (IST) 28 Jan 2017
भाजप हा विचारांचा पक्ष- आशिष शेलार
18:50 (IST) 28 Jan 2017
जेव्हा अहंकार माजला, तेव्हा त्याचा पराभव झाला- आशिष शेलार
18:48 (IST) 28 Jan 2017
आशिष शेलारांकडून शिवसेनेची कौरवांशी तुलना
18:47 (IST) 28 Jan 2017
हम किसी को छेडेंगे नहीं, किसीने छेडा तो छोडेंगे नहीं- आशिष शेलार