ग्रामीण भारताला झुकते माप देताना कृषी मंत्रालयासाठी २७०४९ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.गतवर्षांच्या तुलनेत ही रक्कम २२ टक्क्यांनी जास्त आहे. यातील ३४१५ कोटी रुपये हे कृषी संशोधनासाठी राखून ठेवले आहेत. राष्ट्रीय पशुधन कार्यक्रमासाठी ३०७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी यात एक उपयोजनाही आखण्यात आली आहे. स्थानिक कृषी हवामान विचारात घेऊन उत्पादकता वाढवण्यासाठीही या योजनेचा उपयोग होणार आहे. अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले, की एप्रिल ते डिसेंबर २०१२ या काळात कृषी निर्यात ही १३८४०३ कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. सरकारी खरेदी योजनेत कृषी
आसाम, बिहार, छत्तीसगड व पश्चिम बंगाल या पूर्वेकडील राज्यांत नवीन हरितक्रांती घडवून आणण्यासाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जिथे अगोदरच हरितक्रांती झालेली आहे अशा राज्यात पीकविविधता व तांत्रिक अभिनवतेसाठी ५०० कोटींचा योजनाखर्च दाखवण्यात आला आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी ९९५४ कोटी रुपयांची तरतूद केली असून, कृषी व राष्ट्रीय अन्नसुरक्षा कार्यक्रमासाठी
ग्रामीण भागावर वरदहस्त
संग्रहित लेख, दिनांक 1st Mar 2013 रोजी प्रकाशित
नजर ग्रामीण भारतावर
ग्रामीण भारताला झुकते माप देताना कृषी मंत्रालयासाठी २७०४९ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.गतवर्षांच्या तुलनेत ही रक्कम २२ टक्क्यांनी जास्त आहे. यातील ३४१५ कोटी रुपये हे कृषी संशोधनासाठी राखून ठेवले आहेत. राष्ट्रीय पशुधन कार्यक्रमासाठी ३०७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी यात एक उपयोजनाही आखण्यात आली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 01-03-2013 at 04:41 IST
मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More focus on rural sector in budget