Premium

१ ऑक्टोबरपासून २००० रुपयांच्या नोटेपासून डेबिट अन् क्रेडिट कार्डापर्यंत ‘हे’ ८ नियम बदलणार, सर्वसामान्यांवर थेट परिमाण होणार

सरकारने अनेक प्रकारची ओळख कागदपत्रे बनवण्याचे नियमही सोपे केले आहेत.त्याचबरोबर आर्थिक बाबींशी संबंधित अनेक नियमांमध्ये असे बदल करण्यात आले आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो.

New Rules From 1st October
१ ऑक्टोबरपासून २००० रुपयांच्या नोटेपासून डेबिट अन् क्रेडिट कार्डापर्यंत 'हे' ८ नियम बदलणार (फोटो- फाइल)

१ ऑक्टोबरपासून केंद्रातले मोदी सरकार नवीन नियम लागू करणार आहे. नवीन महिन्याच्या पहिल्या तारखेपासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून आर्थिक बाबींशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. याशिवाय अनेक सरकारी नियमही बदलणार आहेत. हे नवीन नियम तुमच्यावर किती परिणाम करणार आहेत ते जाणून घेणार आहोत. या नियमांची माहिती सरकारने यापूर्वीच दिली होती. अनेक नियमही शिथिल करण्यात आले आहेत. सरकारने अनेक प्रकारची ओळख कागदपत्रे बनवण्याचे नियमही सोपे केले आहेत.त्याचबरोबर आर्थिक बाबींशी संबंधित अनेक नियमांमध्ये असे बदल करण्यात आले आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

TCS नियम लागू होणार

टॅक्स कलेक्शन अॅट सोर्स (TCS) चे नवीन दर १ ऑक्टोबर २०२३ पासून लागू होतील. एखाद्या आर्थिक वर्षात तुमचा खर्च एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला TCS भरावा लागेल. तुम्ही परदेशात प्रवास करत असाल परदेशी इक्विटी, म्युच्युअल फंड किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल किंवा उच्च शिक्षणासाठी परदेशात जात असाल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ची उदारीकृत रेमिटन्स योजनेंतर्गत (LRS) तुम्हाला एका आर्थिक वर्षात २,५०,००० डॉलरपर्यंत पैसे पाठवण्याची परवानगी देते. १ ऑक्टोबर २०२३ पासून वैद्यकीय आणि शैक्षणिक खर्चासाठी दिलेली देयके वगळून आर्थिक वर्षात ७ लाख रुपयांपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय रेमिटन्सवर २० टक्के TCS लागू होणार आहे.

हेही वाचाः १ ऑक्टोबरपासून ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगवर २८ टक्के GST लावला जाणार : CBIC चेअरमन

डेबिट-क्रेडिट कार्डावर नवीन नियम

तुम्हाला तुमच्या डेबिट कार्ड्स, क्रेडिट कार्ड्स आणि प्रीपेड कार्ड्ससाठी नेटवर्क प्रदाता निवडण्याचा पर्याय दिला जाणार असल्याचं RBI ने प्रस्तावित केले आहे. तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता त्या क्षणी नेटवर्क प्रदाता सहसा कार्ड जारीकर्ता ठरवतो. RBI ला बँकांमार्फत १ ऑक्टोबरपासून अनेक नेटवर्कवर कार्ड ऑफर करायचे आहेत आणि ग्राहकांना त्यांच्या पसंतीचे कार्ड नेटवर्क निवडण्याचा पर्याय द्यायचा आहे. कार्ड घेताना किंवा नंतर ग्राहक या पर्यायाचा वापर करू शकतात.

हेही वाचाः RBI Imposes Penalty : RBI ची मोठी कारवाई, SBI नंतर ‘या’ ३ बँकांना दंड; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

२ हजार रुपयांची नोट वैध ठरणार नाही

१ ऑक्टोबरपासून २ हजार रुपयांच्या नोटा वैध नसतील, म्हणजेच त्यांचा व्यवहार करता येणार नाही. तुम्ही तुमच्या २००० रुपयांच्या नोटा अद्याप बदलून घेतल्या नसल्यास ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत तुमच्या जवळच्या बँकेत त्या बदलता येणार आहेत. ३० सप्टेंबर २०२३ ही नोटा बदलण्याची शेवटची तारीख आहे.

बँक खाती आधारशी लिंक करणे आवश्यक

तुम्ही तुमची बचत खाती तुमच्या आधारशी लिंक केली नसल्यास लवकरात लवकर ती लिंक करा. याशिवाय छोट्या बचत योजनांना आधारशी लिंक करणे आवश्यक झाले आहे. असे न केल्यास अशी खातीही गोठवली जाऊ शकतात. पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना आणि पोस्ट ऑफिसशी संबंधित सर्व योजनांसाठी उघडलेली खाती आधारशी जोडणे देखील आवश्यक आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास व्यवहार किंवा गुंतवणुकीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

सरकार डिमॅट खात्यांवरही लक्ष ठेवून आहे

सेबीने डिमॅट खाती, ट्रेडिंग खाती आणि म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत नामांकन प्रक्रिया अनिवार्य केली आहे. जर कोणत्याही खातेदाराने ३० सप्टेंबरपर्यंत नामांकन केले नाही, तर अशी खाती १ ऑक्टोबरपासून गोठवली जातील.

जन्म प्रमाणपत्र अधिक प्रभावी होणार

जन्म प्रमाणपत्राला सरकार प्राधान्य देणार आहे. १ ऑक्टोबरपासून तुम्हाला पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड आणि तुमच्या जन्म प्रमाणपत्राद्वारे बनवलेले मतदार कार्ड यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे मिळू शकतात.

टूर पॅकेज महाग होणार

१ ऑक्टोबरपासून परदेशी टूर पॅकेजही महाग होणार आहेत. १ ऑक्टोबरपासून तुम्हाला ७ लाख रुपयांपेक्षा कमी परदेशी टूर पॅकेजवर ५ टक्के TCS (टॅक्स कलेक्टेड अॅट सोर्स) भरावे लागतील. तसेच ७ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कोणत्याही पॅकवर २० टक्के TCS भरावे लागेल. तसेच परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना यामध्ये सूट देण्यात आली आहे. आर्थिक वर्षात ठराविक रकमेपेक्षा जास्त खर्च केल्यास TCS भरावे लागेल, परंतु वैद्यकीय आणि शिक्षणासाठी झालेला खर्च त्यात समाविष्ट केलेला नाही. आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना TCS भरावे लागणार नाही.

ऑनलाइन गेमिंगवर २८ टक्के GST द्यावा लागणार

१ ऑक्टोबरपासून ऑनलाइन गेमिंगवर २८ टक्के जीएसटी आकारण्यात येणार असल्याचे सरकारने आधीच जाहीर केले होते.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 1 october 2023 from rs 2000 notes to debit and credit cards 8 rules will change direct measurement on common man vrd

First published on: 29-09-2023 at 13:20 IST
Next Story
क्यूआर कोडशिवाय प्रकल्पांच्या जाहिरातींची १०७ प्रकरणे महारेराच्या निदर्शनास; ७४ विकासकांना कारणे दाखवा नोटीस