मे महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर जून महिना सुरू होणार आहे. प्रत्येक नवीन महिन्याच्या सुरुवातीला काही नवे बदलही होत असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत जूनमध्येही असे काही बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर आणि मासिक बजेटवर होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या किमती बदलू शकतात

एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या किमती सरकार दर महिन्याच्या सुरुवातीला ठरवते. सरकारी गॅस कंपन्यांकडून एप्रिल आणि मे महिन्यात १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने कपात करण्यात आलीय. मात्र, १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. अशा परिस्थितीत जूनमध्ये सिलिंडरच्या दरात बदल होतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणे महागणार

१ जूनपासून देशात इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणे महाग होणार आहे. २१ मे रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, अवजड उद्योग मंत्रालयाने इलेक्ट्रिक दुचाकीवरील सबसिडी कमी केली आहे. यापूर्वी ही सबसिडी १५ हजार रुपये प्रति किलोवॅट तास होती, ती कमी करून १० हजार रुपये प्रति किलोवॅट तास करण्यात आली आहे. यामुळे जूनमध्ये इलेक्ट्रिक टू व्हीलर खरेदी करण्यासाठी २५-३० हजार रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे.

१ जूनपासून बँका लोकांचे पैसे शोधून परत करणार

रिझर्व्ह बँकेने बँकांमध्ये पडून असलेल्या दावा न केलेल्या ठेवींचे वारस शोधण्याची मोहीम जाहीर केली आहे. मध्यवर्ती बँकेने देशातील प्रत्येक जिल्ह्यात १०० दिवसांच्या आत सर्वोच्च १०० लावलेल्या ठेवी शोधून काढण्यासाठी बँकांसाठी ‘१०० दिवस १०० पे’ ही मोहीम राबवली आहे. ही मोहीम १ जूनपासून सुरू होणार आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 big changes from 1 june 2023 directly affecting your pocket vrd