उद्योगाचे संस्थापक नेहमी युजर रिसर्च किती महत्त्वाची असते याबद्दल बोलत असताना आपण पाहतो. पण एका आयआयटीमध्ये शिक्षण घेतलेल्या व्यक्तीने याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन पोहचवल्याचा प्रकार समोर आला आहे, MyGate हे १,६७० कोटींचे स्टार्टअप उभं करण्याच्या आधी अभिषेक कुमार यांनी त्यांच्या ग्राहकांना काय हवंय हे जाणून घेण्यासाठी जे केलं त्याची कल्पना कोणीही करू शकणार नाही.
सर्व्हे किंला दुसऱ्या कुणाच्यातरी माहितीवर अवंलंबून न राहता त्यांनी स्वत: कित्येक आठवडे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम केले. याच्या माध्यामातून त्यांनी त्यांचा दररोजचा संघर्ष, त्यांनी येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या सवयी याबद्दल महत्त्वाची माहिती मिळवली. याचा परिणाम काय झाला? तर त्यांनी फक्त हाऊसिंग सोसायटींसाठीच नाही तर त्या चालवणाऱ्या लोकांसीठी एक खास प्रॉडक्ट डिझाइन केले.
भारतातील २५,००० हून अधिक गृहनिर्माण संस्थांमधील ४० लाखांहून अधिक रहिवाशांकडून मायगेट हे सिक्युरिटी आणि कम्युनिटी मॅनेजमेंट अॅप, वापरले गेले आहे. पण याच्या सुरुवातीला याचे संस्थापक कुमार के सुरक्षा रक्षकाचा गणवेश घालून पूर्ण शिफ्टमध्ये काम करत होते.
युजर्स रिसर्चची निवडली अनेखी पद्धत
२०१६ साली जेव्हा मायगेट हे अॅप तयार केलं जात होते तेव्हा भारतीय हवाई दलाचे माजी वैमानिक विजय अरिसेट्टी यांनी भारतात स्मार्ट आणि सुरक्षित रेसिडेंशियल कम्युनिटीजचे भवितव्य ओळखले होते. त्या तयार करण्यासाठी त्यांनी अभिषेक कुमार आणि शेयांश डागा डागा (आयआयटी गुवाहाटी आणि आयएसबी पदवीधर) यांच्याबरोबर हातमिळवणी केली . या तिघांची मिळून मायगेटची संस्थापक टीम उभी राहिली. ही कंपनी सध्या बंगळुरू येथून काम करते.
बहुतांश स्टार्टअप हे फॉर्म आणि मार्केट रिसर्च यावर अवलंबून असतात, पण कुमार यांनी थेट स्त्रोतापर्यंत जाण्याचा पर्याय निवडला. त्यांनी गार्डचा गणवेश चढवला आणि अनुभव घेत त्यांची सर्व कामे केली.
गार्ड म्हणून काम का केलं?
प्राइम व्हेंचर पार्टनर्सबरोबरच्या एका पॉडकास्टमध्ये कुमार यांनी सांगितलं की, “आपल्या सर्वांकडे सर्वोत्तम कल्पना आहेत पण त्याच्या गुणवत्तेचा खरा पुरावा तेव्हा मिळतो जेव्हा तुम्ही जमिनीवर उतरता.”
मायगेटसाठी सिस्टीम डिझाईन करण्याचा अर्थ होता की, इकोसिस्टममधील सर्वात कमी तंत्रज्ञानाबद्दल माहिती असलेला घटक म्हणजे सुरक्षारक्षक- याला ते सहजपणे चालवता आले पाहिजे.
“आम्हाला माहिती होतं की जर आमचे प्रॉडक्ट यशस्वी व्हायचे असेल तर कदाचित सर्वात कमकुवत आणि कदाचित सर्वात मजबूत पॉइंट हा सिक्युरिटी गार्ड हेच असतील, ज्यांना एका प्रकारे हे प्रॉडक्ट चालवायचे आहे. ते मुख्य स्टेकहोल्डर्स आहेत. आणि म्हणून आम्ही गार्ड म्हणून काम करूया आणि त्यांच्या मागे राहूया, दिवसभर त्यांच्याबरोबर बसू या विचाराने सुरूवात केली. आम्ही हे जवळपास एक महिनाभर केलं. आणि मला वाटतं की आमच्यासाठी हे अनेक पातळ्यांवर डोळे उघडणारं होतं,” असे मायगेटचे सह-संस्थापक आणि सीईओ अभिषेक कुमार यांनी सांगितले.
कुमार यांनी पाहिलं की गार्ड हे ० ते ९ अशी इंटरकॉमवरील बटणे दाबत असत. त्यांच्या या कृतीवर आधारित मायगेटच्या टीमने इंटरफेस डिझाईन केला, जो बऱ्यापैकी फोन डायलसारखा होता आणि यामुळे कुठल्याही अडचणीशीवाय त्यावरून इंटरकॉमवरून अॅप वापरणे सोपे झाले.
वेगवेगळ्या कंपन्यांमधील व्यापक अनुभव
मायगेटचे सहसंस्थापक होण्याच्या आधी अभिषेक कुमार यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कामाचा अनुभव घेतला आहे. त्यांच्या करिअरची सुरूवात जुलै २००० मध्ये डल्लास-फोर्ट वर्थ येथे i2 Technologies मध्ये झाली, येथे त्यांनी तीन वर्ष वरिष्ठ सप्लाय चेन कन्सल्टंट म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील ओएन सेमिकंडक्टर या कंपनीत पाच वर्ष काम केले. या काळात त्यांनी वेगवेगळ्या पदांवर महत्त्वाच्या भूमिका बजावल्या.
अमेरिकेत जवळजवळ सहा वर्षे घालवल्यानंतर, २००९ मध्ये ते आयआयएम अहमदाबाद येथे पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन मॅनेजमेंट (पीजीपीएक्स) करण्यासाठी भारतात परतले. त्यानंतर, ते २०१० मध्ये बेंगळुरू येथील गोल्डमन सॅचमध्ये रुजू झाले आणि २०१६ पर्यंत सहा वर्षांहून अधिक काळ तेथे उपाध्यक्ष म्हणून काम केले. ही मोठ्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी पुढे स्टार्टअपवर काम सुरू केले.
मायगेटने आठ फेऱ्यांमध्ये जवळपास ८३.३ दशलक्ष डॉलर्स उभे केले. याचे सर्वात अलिकडची फंडिंग एप्रिल २०१३ मध्ये झाली होती, ज्यामध्ये सिरीज बी राऊंडची किंमत ३.२९ दशलक्ष डॉलर्स होती, ज्यामुळे Tracxn नुसार याचे मूल्य १,६७० कोटी रुपये झाले..