Gautam Adani AGM Hindenburg : गौतम अदाणी यांनी अदाणी समूहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभे(AGM)मध्ये हिंडेनबर्ग रिसर्चचा पुन्हा एकदा खरपूस समाचार घेतला आहे. हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल म्हणजे अदाणी समूहाला पूर्णपणे टार्गेट करण्यात आले असून, खोट्या माहितीच्या आधारे समूहाची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. अहवालात करण्यात आलेले बहुतांश आरोप हे २००४ ते २०१५ या कालावधीतील आहेत. त्या सर्व आरोपांची त्या वेळी अधिकाऱ्यांनी शहानिशा केली होती. हा अहवाल अदाणी समूहाला बदनाम करण्याचा हेतुपुरस्सर आणि दुर्भाग्यपूर्ण प्रयत्न होता, असंही ते म्हणालेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेअर बाजारालाही हानी पोहोचवण्याचा प्रयत्न

वार्षिक सर्वसाधारण सभे(AGM)ला संबोधित करताना ते म्हणाले, हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे केवळ अदाणी समूहाचेच नुकसान झाले नाही. उलट भारताच्या शेअर बाजारालाही हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला. सेबीची चौकशी अजूनही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीनेही अदाणी समूहाने कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचे सांगत हिंडेनबर्ग संशोधन अहवालात तथ्य असल्याचा कोणताही पुरावा सापडलेला नसल्याचं स्पष्ट केलंय. सेबीच्या तपासात अदाणी समूह पूर्ण सहकार्य करीत आहे. न्यायालयाकडून आम्हाला दिलासा मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचाः Sahara India Refund Portal : आता सहारात अडकलेले पैसे त्वरित मिळणार, नेमकी प्रक्रिया काय?

अदाणी समूहाचे शेअर्स कोसळले होते

हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आला होता. ज्यामध्ये अदाणी समूहाने आजपर्यंतची सर्वात मोठी अकाउंटिंग फसवणूक आणि शेअर्समध्ये हेराफेरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर अदाणी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सतत घसरण होत राहिली आणि बाजारमूल्य १०० अब्ज डॉलरहून अधिक घसरले.

हेही वाचाः प्रियंका, कतरिना अन् करिना नव्हे, तर ‘या’ अभिनेत्रीने भरला सर्वाधिक टॅक्स, निव्वळ संपत्ती ५०० कोटी रुपये

१० पैकी ९ कंपन्यांमध्ये अदाणींचे शेअर्स वाढले

एकीकडे अदाणी समूहाची एजीएम सुरू असतानाच दुसरीकडे अदाणी समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या अदाणी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये ३ टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळत आहे. अदाणी पोर्ट आणि सेझच्या शेअर्समध्ये दीड टक्क्यांनी वाढ झाली आहे. अदाणी पॉवर २ टक्के, अदाणी ट्रान्समिशन ३ टक्के, अदाणी ग्रीन सुमारे ३ टक्के, अदाणी टोटल गॅस ०.६३ टक्के, अदाणी विल्मर १.७६ टक्के, अंबुजा सिमेंटचे शेअर १.१६ टक्के आणि एनडीटीव्हीचे शेअर्स २ टक्क्यांहून अधिक वाढताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adani agm hindenburg harmed not only adani group but also the stock market said gautam adani vrd