गौतम अदानी (Gautam Adani) हे सध्या सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. अदानी समूहाचे प्रमुख असलेल्या गौतम अदानींचा जन्म २४ जून १९६२ रोजी अहमदाबाद, गुजरातमध्ये झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी काम शिकण्यासाठी मुंबई (Mumbai) गाठली. हिऱ्यांचा व्यवसाय सुरु करुन ते पुन्हा गुजरातला परतले. १९८८ मध्ये त्यांनी अदानी एंटरप्राईजेस या कंपनीची सुरुवात केली. हळूहळू त्यांनी अन्य क्षेत्रांमध्ये प्रवेश केला. गेल्याकाही वर्षांमध्ये गौतम अदानी हे नाव सर्वांसाठी परिचयाचे झाले आहे. २०२१-२२ च्या सुमारास गौतम अदानी हे जगातल्या१० सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक बनले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी असलेले जवळते संबंध त्यांच्या प्रगतीचे कारण आहे असे म्हणत त्यांच्यावर टीका देखील केली जाते. त्यांच्यावर काही खटले देखील सुरु आहेत.
२०२३ मध्ये शेअर मार्केटमध्ये मुद्दामून फेरफार करत घसरण आणल्याचे आरोप त्यांच्यावर केले आहेत. ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ या संस्थेने या संदर्भामध्ये अदानी समूहावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या प्रकरणाचा परिणाम अदानींच्या शेअर्सवर झालेला पाहायला मिळाला. एकूण स्थिती पाहून सरकारने त्यावर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.Read More
अदानींच्या कंपनीला वनजमीन देण्यासाठी दलालांच्या सहाय्याने कोकणात ५,००० हजार एकर जमिनी बळकावल्या. यासाठी अनेकवेळा मयत व्यक्तींच्या नावाने खोटे व्यवहार केल्याचा…
Priyanka Gandhi Targets PM Narendra Modi: काँग्रेसच्या रायपूरमधील राष्ट्रीय अधिवेशनात बोलत असताना प्रियांका गांधी यांनी बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न यावरुन…
सर्वोच्च न्यायालयाने हिंडेनबर्ग रीसर्चने अदाणी उद्योग समूहासंदर्भात प्रकाशित केलेल्या अहवालाबाबत वार्तांकनावर मर्यादा घालण्याची मागणी फेटाळून लावली आहे.