Cognizant CEO Ravi Kumar S : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापरामुळे सध्या कंपन्यांमधील वर्कफोर्समध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत, यादरम्यान प्रसिद्ध आयटी कन्सल्टिंग फर्मचे कॉग्निझंट (Cognizant) एंट्री-लेव्हल नोकर भरती वाढवत आहे. कंपनीचे सीईओ रवी कुमार एस यांनी ‘फॉर्च्यून’शी बोलताना सांगितले की, यावर्षी ते पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात नवीन पदवीधरांची भरती करत आहेत. आणि विशेष बाब म्हणजे ते फक्त बड्या पारंपरिक तंत्रज्ञान संस्थांकडेच नाही तर लिबरल आर्ट्स आणि कम्युनिटी कॉलेजांकडेही यासाठी लक्ष देत आहे.
एआयमुळे कॉर्पोरेट एम्प्लॉयमेंटचा आधार संकुचित होण्याऐवजी तो अधिक विस्तृत होईल या विश्वासातून रवी कुमार यांची ही रुढिबद्ध नसलेली रणनीती तयार झाली आहे. फॉर्च्यूनशी बोलताना ते म्हणाले, “मी एका पदवीधर घेऊ शकतो आणि त्याला टूलिंग देईल, ज्यामुळे तो आपल्या क्षमतेपेक्षा अधिक चांगले काम करू शकेल.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक मानवी क्षमतेचे ॲम्प्लीफायर आहे. ती काही विस्थापनाची (displacement) रणनीती नाही.”
लिबरल आर्ट्स पदवीधरांना तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या संधी
३५०००० कर्मचारी असलेल्या आयटी कन्सल्टिंग फर्मचे सीईओ (CEO) आता non-STEM पदवीधरांची म्हणजेच विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांची पार्श्वभूमी नसलेल्या पदवीधरांची सक्रियपणे भरती करत आहेत. ज्यामध्ये मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि पत्रकार यांचा समावेश आहे.
यामागे त्यांचा नेमका या विचार आहे हे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते AI मुळे प्रत्येकाकडे एक्सपर्टिज येत आहेत, ज्यामुळे स्पेशलायजेशनचे महत्त्व कमी होत आहे. बुद्धिमत्तेत असमानता राहिलेली नाही. बुद्धिमत्तेच्या वापर यामध्ये असमानता आहे,” असे कुमार यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांना एकत्र करणाऱ्या (interdisciplinary) कौशल्यांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. हा मुद्दा पटवून देण्यासाठी त्यांनी इतिहासकार संगणकीय कौशल्य वापरून भविष्याचा वेध घेत आहेत किंवा बायोलॉजीचे विद्यार्थी एआय वापरून ड्रग डेव्हलपमेंट सायकल्सचा शोध घेत असल्याचे उदाहरण देखील दिले.
कुमार यांच्या मते जे लोक AI टूल्सचा स्वतःच्या फायद्यासाठी प्रभावीपणे वापर करू शकतात, त्यांच्यासाठी एक्सपर्टिज मिळवण्याचा मार्ग आता अधिक वेगवान झाले आहेत, त्यामुळे कॉर्पोरेट पिरॅमिड हा अधिक रुंद आणि लहान होत आहे.
