कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ही भारतातील सर्व पगारदार कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेली निवृत्ती बचत योजना आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी एक वैधानिक संस्था, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे प्रशासित, ही योजना नियोक्ता-कर्मचारी योगदानाद्वारे आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करते. दोन्ही पक्ष कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराच्या १२% निधीमध्ये योगदान देतात, ज्यामुळे पेन्शन, विमा आणि निवृत्तीच्या वेळी एकरकमी पैसे काढणे, असे फायदे मिळतात.
EPF तुमचे दीर्घकालीन भविष्य सुरक्षित करते, तर मुदत ठेवी (FD) वापरून विविधता आणल्याने स्थिर परतावा मिळून तुमची बचत वाढू शकते. बजाज फायनान्स FD वर वार्षिक ७.३०% पर्यंत दरमहा व्याज देते, ज्यामुळे EPF सोबत तुमचे पैसे वाढविण्याचा धोकामुक्त मार्ग मिळतो.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी किंवा EPF म्हणजे काय?
या योजनेत, तुमचा नियोक्ता (नोकरी देणारी संस्था) दरमहा तुमच्या पगारातून एक निश्चित रक्कम कापतो आणि तुमच्या EPF खात्यात तेवढीच रक्कम जमा करतो. तुम्ही निवृत्तीनंतर ही बचत काढू शकता किंवा तातडीच्या आर्थिक गरजांसाठी त्यावर कर्जदेखील घेऊ शकता.
ईपीएफ फॉर्म
ईपीएफ कर्मचारी सदस्याच्या खात्याशी संबंधित विविध कामे करण्यासाठी ईपीएफ फॉर्म आवश्यक आहेत. नोंदणी असो, पीएफ ट्रान्स्फर असो, पैसे काढणे असो किंवा कर्ज घेणे असो, या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी योग्य ईपीएफ फॉर्म सादर करणे अनिवार्य आहे.
खालील वेगवेगळ्या EPF आणि EPS फॉर्म्सचा आढावा त्यांच्या संबंधित उद्देशांसह दिला आहे:
फॉर्म २
उद्देश – नामांकन आणि घोषणापत्रासाठी (nomination and declaration)
लागू (Applicable) – EPF आणि EPS करिता
फॉर्म ५
उद्देश – EPF आणि EPS अंतर्गत नवीन कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यासाठी
लागू (Applicable) – EPF आणि EPS करिता
फॉर्म ५ IF
उद्देश – EDLI योजनेअंतर्गत लाभांचा दावा करण्यासाठी
लागू (Applicable) – EDLI करिता
फॉर्म १०C
उद्देश – विथड्रॉवल(पैसे काढण्याच्या) फायदे मिळविण्यासाठी किंवा योजनेच्या प्रमाणपत्रासाठी
लागू (Applicable) – EPS करिता
फॉर्म १०D
उद्देश – मासिक पेन्शन मिळविण्यासाठी
लागू (Applicable) – EPS
फॉर्म ११
उद्देश – EPF खाते हस्तांतरित करण्यासाठी
लागू (Applicable) – EPS
फॉर्म १४
उद्देश – LIC पॉलिसी खरेदी करण्यासाठी
लागू (Applicable) – EP
फॉर्म १५G
उद्देश – EPF व्याजावरील कर सूट दावा करण्यासाठी
लागू (Applicable) – EPF
फॉर्म १९
उद्देश – कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधीची पूर्तता करण्यासाठी
लागू (Applicable) – EPF
फॉर्म २०
उद्देश – कर्मचाऱ्याच्या मृत्यूच्या बाबतीत EPF चा दावा करण्यासाठी
लागू (Applicable) – EPF
फॉर्म ३१
उद्देश – ईपीएफ काढण्यासाठी
लागू (Applicable) – ईपीएफ
हे फॉर्म ईपीएफ आणि ईपीएस-संबंधित विनंत्यांचे सुलभ प्रक्रियाकरण सुनिश्चित करतात, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे फायदे कार्यक्षमतेने मिळू शकतात.
ईपीएफ काढण्याचे नियम (EPF Withdrawal Rules)
कर्मचारी त्यांचे ईपीएफ शिल्लक अंशतः किंवा पूर्णपणे काढू शकतात; परंतु पैसे काढण्याची परवानगी केवळ विशिष्ट परिस्थितींमध्येच आहे.
पूर्ण ईपीएफ काढणे (Full EPF withdrawal)
खालील परिस्थितीत एखादी व्यक्ती संपूर्ण ईपीएफ शिल्लक काढू शकते:
नोकरीतून निवृत्ती (Retirement from work)
दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ बेरोजगार असल्यास…
नोकरी बदलणे किंवा करिअर बदलणे, जर बेरोजगारीचा कालावधी दोन महिन्यांपेक्षा जास्त असेल तर.
आंशिक ईपीएफ काढणे (Partial EPF withdrawal)
कर्मचारी त्यांच्या ईपीएफ बचतीचा काही भाग या परिस्थितीत काढू शकतात :
- विवाह खर्च (स्वतःचा किंवा अवलंबून असलेल्या व्यक्तीचा).
- उच्च शिक्षण निधी.
- जमीन खरेदी करणे किंवा घर बांधणे.
- गृहकर्जाची परतफेड.
- अस्तित्वात असलेल्या घराचे नूतनीकरण किंवा दुरुस्ती.
- ईपीएफ काढणे केवळ आवश्यकतेनुसारच केले पाहिजे. कारण- ईपीएफ बचत दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा प्रदान करते.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) फायदे (Employees Provident Fund (EPF) Benefits)
१. निवृत्ती बचत
EPF तुमच्या निवृत्तीच्या वर्षांसाठी बचत करण्याचा पर्याय देते. तुम्ही आणि तुमचा नियोक्ता दोघेही नियमित योगदान देऊन, कालांतराने एक मोठा निधी तयार होतो.
२. कर फायदे
तुमचे EPF मधील योगदान आयकर कायद्याच्या कलम ८०C अंतर्गत कर-सवलतयोग्य आहे. याव्यतिरिक्त मिळालेले व्याज आणि पैसे काढणे (मॅच्युरिटीच्या वेळी)देखील कर-सवलत आहे.
३. आर्थिक सुरक्षितता
EPF ही एक सरकार-समर्थित योजना आहे, जी तुमच्या गुंतवणुकीवर सुरक्षा आणि हमी परतावा प्रदान करते.
४. आंशिक स्वरूपात पैसे काढणे
विशिष्ट परिस्थितीत (वैद्यकीय आणीबाणी, घर खरेदी इ.) तुम्ही निवृत्तीपूर्वी तुमच्या EPF शिल्लकमधून आंशिक स्वरूपात पैसे काढू शकता.