मुंबईः भारताला हळद उत्पादनाचे जागतिक केंद्र बनविता येईल आणि २०३० पर्यंत हळद निर्यात १०० कोटी डॉलरचे उद्दिष्ट साध्य करेल, असा अंदाज आयसीआरआयईआर-ॲम्वे इंडियाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालाने व्यक्त केला. मात्र हळद उत्पादन स्थिर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सरकारकडून समर्पक हस्तक्षेपाची गरज असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> रुपयाच्या अवमूल्यनामुळे परदेशातून कर्ज उभारणी महाग

तेलंगणाच्या निजामाबादमध्ये राष्ट्रीय हळद मंडळाच्या उद्घाटनानंतर प्रसिद्ध झालेल्या या अहवालात जागतिक हळद उत्पादक आणि निर्यातदार म्हणून भारताचे स्थान मजबूत करण्यासाठी आवश्यक धोरणांचा आराखडा मांडण्यात आला आहे, असे आयसीआरआयईआरचे संचालक दीपक मिश्रा यांनी बुधवारी अहवालाचे अनावरणप्रसंगी सांगितले. राष्ट्रीय मंडळाच्या स्थापनेने गुणवत्ता मानके, उत्पादकांचा शोध आणि उत्पादन प्रमाणन, तसेच निर्यातयोग्य चाचणी प्रक्रिया सुलभ बनेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> डिसेंबरमध्ये देशाच्या निर्यातीत घसरण; नेमके कारण काय?

भारतात हळदीच्या ३० पेक्षा जास्त जाती असून, अधिक भौगोलिक संकेत (जीआय) मानांकित उत्पादनांना वाव आहे. चालू हंगामात देशभरात २,९७,४६० हेक्टर क्षेत्रफळावर हळदीची लागवड केली गेली असून, १०.४१ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. अहवालाने असेही नमूद केले आहे की, अनेकांगी आरोग्यदायी फायदे असलेल्या उच्च-कर्क्युमिन हळदीच्या जागतिक मागणीच्या केवळ १० टक्के पुरवठा करण्यास भारतीय उत्पादक सक्षम आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India turmeric export target of 1 billion doller by 2030 print eco news zws