Commercial LPG Cylinder Price Today: सार्वजनिक क्षेत्रातील तेल विक्रेत्या कंपन्यांनी शुक्रवार, १ डिसेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती २१ रुपयांनी वाढवल्याचे वृत्त आहे. दर वाढीनंतर, १९-किलोग्राम व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत नवी दिल्लीमध्ये १,७९६.५ रुपये आणि मुंबईमध्ये १,७४९ रुपये करण्यात आली आहे. चेन्नईमध्ये किंमत १९६८.५ रुपये असेल तर कोलकातामध्ये १९०८ रुपये करण्यात आली आहे. हे दर आजपासून लगेचच लागू करण्यात येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी १६ नोव्हेंबरला व्यावसायिक एलपीजीच्या किमती ५७ रुपयांनी कमी झाल्या होत्या. तर आता राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोरम या राज्यांमध्ये मतदान पूर्ण होताच पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस सिलेंडरचे भाव वाढवण्यात आले आहेत. येत्या ३ डिसेंबर रोजी पाच राज्यांच्या निवडणुकांचा शेवटचा टप्पा म्हणजेच मतमोजणी व निकाल असणार आहे.

यापूर्वी ऑक्टोबरमध्ये, ओएमसीने व्यावसायिक एलपीजीच्या किमती २०९ रुपयांनी वाढवल्या होत्या, आणि त्याआधी सप्टेंबरमध्ये १५८ रुपयांची कपात केली होती. इस्त्रायल-हमास युद्धामुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली होती परिणामी आता व्यावसायिक सिलिंडरचे भाव सुद्धा वाढले आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lpg gas cylinder price hike as election voting of madhya pradesh rajasthan and five states finished yesterday check new prices svs