जागतिक स्तरावर अनेक तंत्रज्ञान कंपन्या मंदीच्या चिंतेमुळे टाळेबंदीच्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहेत. दरम्यान, ओरॅकल या टेक फर्मला पुन्हा एकदा टाळेबंदीचा फटका बसला आहे. मात्र यावेळी त्याचा ओरॅकलच्या आरोग्य विभागातही परिणाम दिसून आला आहे. ओरॅकलच्या आरोग्य युनिटमधून शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. विशेष म्हणजे इतर सॉफ्टवेअर दिग्गज कंपन्यादेखील नोकरीच्या ऑफर रद्द करीत आहेत आणि काही खुल्या जागा कमी करीत आहेत. त्यामुळे अमेरिकन कंपन्यांमध्ये नोकर कपात सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. आता वाढती महागाई आणि वाढत्या व्याजदरामुळे कॉर्पोरेट कंपन्या झपाट्याने कर्मचाऱ्यांची संख्या कमी करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Oracle च्या Kerner डिव्हिजनने यूएस डिपार्टमेंट ऑफ वेटरन्स अफेयर्स ऑफिसबरोबर रुग्णांची आरोग्य माहिती साठवण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या इलेक्ट्रॉनिक सिस्टीमची देखभाल आणि सुधारणा करण्यासाठी करार केला. परंतु त्याचदरम्यान कर्नर सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे अनेक रुग्ण प्रभावित झाले, त्यामुळे यूएस संरक्षण विभागाने करार स्थगित ठेवलाय. या समस्येशी सामना करण्यासाठीच ओरॅकल कंपनीनं नोकर कपात केल्याचं सांगितलं जात आहे.

भारतातील कामगार प्रभावित होण्याची शक्यता

Oracle कंपनीकडून ज्या कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात येत आहे, त्यांना चार हप्तांचा पगार, जेवढी वर्षे काम केले, त्या हप्त्यांनुसार अतिरिक्त पगार, सुट्टीच्या दिवसांचे पैसेसुद्धा मिळणार आहेत. विशेष म्हणजे कंपनीचे भारतातही मोठे कर्मचारी आहेत. या निर्णयानं भारतातील कामगार प्रभावित होतील की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे.

हेही वाचाः सर्व स्थावर संपदा एजंट्सनी १ सप्टेंबरपूर्वी महारेराचे प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक, अन्यथा…; महारेराचा सर्व विकासक आणि नोंदणीकृत एजंट्सनाही इशारा

नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना सोशल मीडियावरून पाठिंबा

कर्नरचे माजी कामगार आणि आरोग्य तंत्रज्ञान समूहाच्या सदस्यांनीदेखील नोकरी सोडावी लागलेल्या कर्मचार्‍यांना लिंक्डइनवर पाठिंबा दिला. सर्नर/ओरॅकल हेल्थच्या माजी सहकाऱ्यांबद्दल वाईट वाटले. लिंक्डइनवरील कॅथी शोनिंग यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “मला तुमच्याबद्दल खेद वाटतो, पण मदत करण्यासाठी मी इथे उपलब्ध आहे. कर्नर एकेकाळी चांगली कंपनी होती आणि तुम्हाला चांगले शिकवते. तुम्ही अजूनही सक्षम आहात त्यावर विश्वास ठेवा,” असंही सर्नर येथील व्यावसायिक सेवांचे माजी व्हीपी कॅथी शोनिंग यांनी लिंक्डइनवर सांगितले.

हेही वाचाः ६३ हजार कोटी रुपये : सरकारी कंपन्या इतिहास घडवणार! तिजोरीत विक्रमी डिव्हिडंडची भर टाकणार

लिंक्डइन वापरकर्त्यांनी केली ही पोस्ट

लिंक्डइन वापरकर्त्या विवियन रामोसने एका पोस्टमध्ये म्हटले की, ते कंपनीत ८ महिने काम करीत होते आणि कंपनीनं त्यांना अचानक काढून टाकल्याची घोषणा केली. शोनिंगच्या पोस्टवर त्यांची टिप्पणी अशी आहे की, “आज ज्या लोकांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले, त्यांच्यापैकीच मी एक आहे. माझ्या हृदयाला खूप वेदना झाल्या आहेत. मी सुमारे कंपनीत ७ महिन्यांपूर्वी कामाला सुरुवात केली, माझे कामही चांगले असल्यानं मला चांगला प्रतिसाद मिळाला आणि माझ्या व्यवस्थापनाकडून मला खूप पाठिंबा मिळाला. मला माझी भूमिका आवडली. परंतु त्यानंतरही मला अचानक काढून टाकण्यात आले. या मोठ्या टाळेबंदीमुळे प्रभावित झालेल्या सर्वांना मी माझ्या शुभेच्छा देतो. या वर्षाच्या सुरुवातीलाच ओरॅकलने खर्च कमी करण्याच्या इतर उपायांसह ३,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. आयटी कंपनीने पगारवाढ आणि पदोन्नती थांबवली आहे. अनेक माजी कर्मचारी नवीन नोकऱ्या शोधण्यासाठी लिंक्डइनकडे वळलेत. ओरॅकलने मागे आपल्या भारत विभागातील कर्मचाऱ्यांनाही काढून टाकले होते.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oracle layoff hundreds of employees were shown the way out in oracle what is the real case vrd