Perplexity CEO Aravind Srinivas said Internet is too important to be left in Googles hands: परप्लेक्सिटीचे सीईओ अरविंद श्रीनिवास हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यांनी नुकतेच कॉमेट एआय ब्रॉउझर लाँच केले असून गुगलची मक्तेदारी संपवण्यासाठी ते याचा जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. नुकतेच त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर परप्लेक्सिटीने गेल्या महिन्यात लाँच केलेल्या त्यांच्या कॉमेट ब्राउझरचा एक शॉर्ट व्हिडीओ पोस्ट केला आहे. या बरोबर त्यांनी “इंटरनेट अत्यंत महत्त्वाचे असल्याने ते फक्त गुगलच्या हाती सोडता येणार नाही” असे कॅप्शन दिले आहे.
परप्लेक्सिटी कंपनीने गुगलकडून क्रोम ब्राउझर ३४.५ अब्ज डॉलरला विकत घेण्याची ऑफर दिली होती, त्यानंतर ही पोस्ट करण्यात आली आहे. तसेच परप्लेक्सिटीने गुगल क्रोमच्या स्पर्धेत करण्यासाठी ‘कॉमेट नावाचे स्वतःचा एआय-पॉवर्ड ब्राउझर लॉन्च केले आहे. हे वेब ब्राउझर क्रोमियम ओपन-सोर्स फ्रेमवर्कवर तयार केलेले आहे.
ऑगस्ट महिन्यात परप्लेक्सिटीने गुगलचे क्रोम ब्राउझर विकत घेण्यासाठी ३४.५ अब्ज डॉलरची ऑफर दिली होती. फक्त तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या परप्लेक्सिटी या स्टार्टअप कंपनीनीचे मूल्य अवघे १८ अब्ज डॉलर असूनदेखील गुगलला ही ऑफर दिल्याचे सांगितले होते. क्रोमचे जगभरात ३ अब्जाहून अधिक वापरकर्ते असल्याने, एआय पॉवर्ड सर्चच्या क्षेत्रात परप्लेक्सिटीसाठी क्रोम हा अत्यंत फायदेशीर सौदा ठरला असता.
परप्लेक्सिटीने दिलेल्या ३४.५ अब्ज डॉलर्सच्या प्रपोजलमध्ये रेग्युलेटरी आणि वापरकर्त्यांच्या समस्या सोडवण्याची वचनबद्धता देखील देण्यात आले होते. तसेच कंपनीची योजना होती की, ते आगामी दोन वर्षात क्रोमच्या विकासासाठी ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करतील. इन्फ्रास्ट्रक्चर, क्रोमिअम हे ओपन सोर्स म्हणून कायम ठेवतील आणि क्रोमच्या डिफॉल्ट सर्च सेटिंगमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही.
अमेरिकेतील एका न्यायाधीशांनी गूगलने इंटरनेट सर्चमध्ये बेकायदेशीर मक्तेदारी तयार केल्याचा निर्णय दिल्यानंतर, अमेरिकेचे डिपार्टमेंट ऑफ जस्टिस हे गूगलला क्रोमची विक्री करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करत होते, यावेळी परप्लेक्सिटीने ते विकत घेण्याची ऑफर दिली होती.
कॉमेट ब्राउझर काय आहे?
गेल्या महिन्यात परप्लेक्सिटीने कॉमेट ब्राउझर लाँच केले आहे. हे क्रोमियम फ्रेमवर्कवर तयार करण्यात आले आहे. आणि क्रोम एक्सटेंशन व बुकमार्कला सपोर्ट करते. तसेच यामध्ये एआय आधाकरित टूल्स आहेत जे प्रॉडक्टिव्हीटी, सर्चेस आणि टास्क मॅनेजमेंटमध्ये मदत करतात.
कॉमेट ब्राउझरमध्ये एक एआय साईडबार असिस्टंट दिला आहे जो लेखांचा सारांश काढणे, ईमेल लिहिणे यांसारखी अनेक कामे करू शकतो. कॉमेट सध्या भारतात परप्लेक्सिटी प्रो. यूजर्ससाठी विंडोज आणि मेकओएसवर उपलब्ध आहे. अँड्रॉइडवर यासाठी प्री-ऑर्डर सुरू झाल्या आहेत. मात्र आयओएसवर अद्याप हे उपलब्ध नाही.
