UPI rule changes from August 1: आपल्यापैकी अनेक जण यूपीआयचा सर्रास वापर करत असाल, तर ही बातमी तुम्हा सर्वांसाठी आहे. कारण येत्या १ ऑगस्ट २०२५ पासून युपीआयचे काही नियम बदलणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही दरोरोज Paytm, PhonePe, GPay किंवा इतर कोणत्याही यूपीआय प्लॅटफॉर्मचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी हे बदल काय आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या बदलांचा कदाचित तुमच्या दैनंदीन वापरावर फारसा फरक पडणार नाही, पण यामुळे काही गोष्टींवर, जसे की बॅलेंस चेक करणे, स्टेटस रिफ्रेश करणे यासारख्या आणि इतर काही गोष्टींवर नक्कीच मर्यादा येणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) दिलेल्या माहितीनुसार, यूपीआयचा वापर करताना कोणताही अढथळा येऊ नये, विश्वासार्हता वाढावी आणि जास्त वापर केला जात असताना यूपीआय प्लॅटफॉर्मची सेवा बंद पडू नये, यासाठी हे नवे बदल केले जात आहेत.

बदल काय झाला?

तर पुढील महिन्यापासून यूपीआय वापरकर्ते हे दिवसातून फक्त ५० वेळा त्यांच्या खात्यातील रक्कम तपासू शकतील. तसेच वापरकर्त्यांना त्यांच्या फोन नंबरशी लिंक केलेले बँक खाती दिवसातून फक्त २५ वेळा पाहाता येणारा आहे. सिस्टमवरील अनावश्यक ट्रॅफिक कमी करण्यासाठी हे नवीन नियम देण्यात आले आहेत. NPCI चा दावा आहे की या सेवांचा जास्त वापर केल्याने सेवेचा वेग मंदावणे आणि आउटेज होणे अशा गोष्टी घडतात.

यूपीआय ऑटोपेमध्ये (UPI AutoPay) कोणते बदल होणार?

एनपीसीआय आता यूपीआय ऑटोपे व्यवहारांसाठी निश्चित वेळेचे स्लॉट घेऊन येत आहे. याचा अर्थ असा की, ऑटो पेमेंट, सबस्क्रिप्शन, युटिलिटी बिल किंवा EMI सारखे आधीच शेड्यूल केलेले पेमेंट दिवसभरात कधीही होण्याऐवजी विशिष्ट कालावधीत प्रोसेस केले जातील. या बदलाचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणे अपेक्षित नाही. उलट यामुळे एकदाच प्लॅटफॉर्मवर एकदाच होणारे व्यवहार काही प्रमाणात कमी होऊन दिवसभरातील वापराच्या वेळी प्लॅटफॉर्मची गती वाढेल.

वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार?

तुम्ही दिवसातून एकदा UPI वापरत असलात किंवा २० वेळा, या नवीन मर्यादा सर्व प्लॅटफॉर्मवरील सर्व वापरकर्त्यांना लागू होतील. पण जर तुम्ही तुमचे पेमेंट स्टेटस सतत रिफ्रेश केले नाही किंवा तुमची बॅलेन्स अनेक वेळा तपासले नाही, तर या बदललेल्या नियमांचा तुमच्यावर फारसा फरक पडणार नाही. हे बदल प्रामुख्याने अशा वापरकर्त्यांसाठी आहेत जे अजाणतेपणे वारंवार रिक्वेस्ट करून यंत्रणेवर जास्तीचा ताण टाकतात.

जास्तीत जास्त किती पेमेंट करता येईल?

विशेष बाब म्हणजे सध्याच्या यूपीआय पेंमेट कॅपमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच व्यवहराची मर्यादा होती तिच राहणार आहे. जी बहुतेक प्रकरणांमध्ये दर व्यवहाराला १ लाख रुपयांपर्यंत आणि आरोग्यसेवा किंवा शिक्षण यासारख्या कॅटेगरींमध्ये ५ लाख रुपयांपर्यंत आहे. १ ऑगस्टरोजी होणाऱ्या बदलांमध्ये याला धक्का लावण्यात आलेला नाही.

वापरकर्त्यांनी काय करणे अपेक्षित आहे?

तर १ ऑगस्टनंतर वापरकर्त्यांना स्वतःहून काहीही करण्याची आवश्यकता नाही. हे बदल तुमच्या यूपीआय अॅपमध्ये आपोआप लागू केले जातील. फक्त नव्याने घालून दिलेल्या लिमीट्स लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला अनावश्यक मनस्ताप सहन करावा लागणार नाही.