रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) २३ मेपासून २००० रुपयांच्या नोटा बदलण्यास सुरुवात केली आहे. या नोटा २३ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत बदलण्यात येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. २०,००० रुपये किंवा जास्तीत जास्त दोन हजारांच्या १० नोटांची मर्यादा मध्यवर्ती बँकेने निश्चित केली आहे. म्हणजेच एक व्यक्ती एका दिवसात जास्तीत जास्त २० हजार किंवा दोन हजारांच्या १० नोटा बदलू शकते. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनंतर एसबीआय आणि पीएनबीसारख्या मोठ्या बँकांनीही याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केलीत. आज आपल्या रिपोर्टमध्ये आपण देशातील प्रमुख बँकांमध्ये २००० रुपयांच्या नोटा बदलून आणि जमा करण्याच्या प्रक्रियेबद्दल जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्टेट बँक ऑफ इंडियात नियम काय?

देशातील सर्वात मोठी बँक SBI कडून सांगण्यात आले की, कोणतीही व्यक्ती कोणताही फॉर्म किंवा स्लिप न भरता २०,००० रुपयांपर्यंतच्या नोटा बदलू शकते, यासाठी कोणतेही ओळखपत्र दाखवावे लागणार नाही.

एचडीएफसी बँक

HDFC बँकेने जारी केलेल्या नोटिशीनुसार, कोणतीही व्यक्ती ३० सप्टेंबरपर्यंत कोणत्याही शाखेत २००० रुपयांच्या नोटा जमा करू शकते. त्याचबरोबर २०,००० रुपयांपर्यंतच्या नोटा एकावेळी बदलता येतील.

आयसीआयसीआय बँक

ICICI बँकेकडून सांगण्यात आले की, ग्राहक बँकेच्या कोणत्याही शाखेत किंवा कॅश डिपॉझिट मशीनला भेट देऊन २००० रुपयांच्या नोटा जमा करू शकतात. २००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी बँकेकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

पंजाब नॅशनल बँक

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेमध्ये समाविष्ट असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (PNB) सांगितले आहे की, कोणतेही ओळखपत्र न मागता आणि बँकेत फॉर्म भरल्याशिवाय २००० रुपयांच्या नोटा २०,००० च्या मर्यादेपर्यंत बदलल्या जातील.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are the rules for exchanging rs 2000 notes in sbi hdfc pnb and icici bank find out vrd