जीएसटी परिषदेची ५० वी बैठक मंगळवारी ११ जुलै रोजी नवी दिल्लीत येथे पार पडली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत अनेक वस्तू आणि सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा किंवा त्यांना जीएसटीमधून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ऑनलाइन गेमिंगसह अनेक वस्तूंवर जीएसटी लावण्याचा किंवा वाढवण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या वस्तू किंवा सेवांच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर कोणत्या वस्तू स्वस्त होणार आणि कोणत्या महागणार हे जाणून घेऊ यात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय स्वस्त असेल?

  • जीएसटी कौन्सिल कर्करोगाशी लढणारी औषधे, दुर्मीळ आजारांवरील औषधांना जीएसटी करातून सूट दिली आहे.
  • खासगी कंपन्यांच्या उपग्रह प्रक्षेपणाच्या सुविधेलाही जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे.
  • मत्स्य तेल काढताना मिळणारे द्रव्य (Fish Solubale paste) आणि एलडी स्लॅग(LD Slag)वरील जीएसटी दर १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे.
  • कच्चे आणि न तळलेले, वाळवलेले चिप्स आणि तत्सम पदार्थांवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे.
  • सिनेमागृहांमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थावरील जीएसटी दरही १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे.
  • जरी धाग्यावरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे.

काय महाग होणार

  • जीएसटी कौन्सिलने मल्टी युटिलिटी व्हेईकल्स (MUV) वर २२ टक्के सेस लादण्यास मान्यता दिली आहे.
  • ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रेसिंग आणि कॅसिनोमध्ये गुंतवलेल्या संपूर्ण रकमेवर २८ टक्के कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What will be cheap and what will be expensive after the gst council meeting know the complete list vrd