Zomato founder Deepinder Goyal buys super luxury apartment : झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल हे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे आणि याचे कारण म्हणजे त्यांनी गुरुग्राममधील डीएलएफच्या द कॅमेलियाज (The Camellias) मध्ये एक ‘सुपर-लक्झरी’ अपार्टमेंट खरेदी केले आहे. या अपार्टमेंटची किंमत ५२.३ कोटी रुपये इतकी प्रचंड आहे.
गोयल यांनी मार्च महिन्यात अपार्टमेंटची कन्व्हेयन्स डीड म्हणजेच मालमत्तेची मालकी दुसर्याकडे हस्तांतरित करण्याची कागदपत्रे सादर करण्यात आली होती, त्यामध्ये त्यांनी ३.६६ कोटी रुपये स्टँप ड्यूटी भरली होती. रिअल इस्टेट अॅनालिटिक्स फर्म झॅपकीने मिळवलेल्या कागदपत्रांमधून ही माहिती उघड झाली आहे.
इतकी किंमत का?
गोयल यांनी विकत घेतलेले हे अपार्टमेंट १०,८१३ चौरस फूटांहून अधिक जागेत पसरलेले आहे आणि यामध्ये पाच पार्किंगच्या जागा देण्यात आल्या आहेत. हे अपार्टमेंट २०२२ मध्ये थेट बिल्डर डीएलएफ लिमिटेड कडून विकत घेण्यात आले होते. तसेच याची कन्व्हेयन्स डीड १७ मार्च २०२५ रोजी पूर्ण झाल्याचे कागदपत्रात नमूद केलेले आहे.
विशेष बाब म्हणजे बाजारातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जून २०२२ मध्ये विकत घेतलेल्या या अपार्टमेंटची सध्याची किंमत बाजारभावानुसार १०० कोटी रूपयांहून अधिक आहे.
गुरूग्रामच्या डीएफएल फेज-५ मधील डीएफएल द कमेलियाज हा एक सुपर लक्झरी रेसिडेंशियल प्रोजेक्ट आहे आणि हा प्रोजेक्ट यामध्ये देण्यात आलेल्या फाईव्ह स्टार हॉटेलप्रमाणे सुविधांसाठी ओळखला जातो. अत्यंत महागड्या घरांच्या किंमतीमुळे हा प्रकल्प नेहमीच चर्चेत असतो