गुंतवणूक, घराची खरेदी- विक्री, शेअर आदी सर्व व्यवहारांच्या संदर्भात आपल्याला नेहमी अनेक प्रश्न पडतात. कधी ते कर वाचविण्याच्या संदर्भात असतात तर कधी करपरताव्याच्या संदर्भात, कधी दीर्घकालीन नफ्या संदर्भात या सर्व प्रश्नांची उत्तरे दर शनिवारी मनीमंत्र सदरातील तज्ज्ञ देतील!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
प्रश्न तुमचे उत्तरं तज्ज्ञांची

मनोज सोनवणे, प्रश्न१: सोने तारण कर्ज किती प्रकारात मिळते?
सोने तारण कर्ज खेळत्या भांडवलासाठी कॅश क्रेडीट पद्धतीने तर अन्य प्रासंगिक गरजांसाठी डिमांड लोन स्वरुपात मिळते . या शिवाय शेतकर्यांना शेतीच्या कामासाठी (उदा: विहीर खोदणे, पाईप लाईन, किंवा शेतीसाठी आवश्यक अवजारे, , यंत्र तसेच ट्रॅक्टर खरेदीसाठी )मुदतीचे कृषी सोने तारण कर्ज मिळते.तर हंगामी पिकासाठी हंगामानुसार कालावधीचे कॅश क्रेडीट पद्धतीनचे सोने तारण कर्ज मिळते.

संग्राम पाटील, प्रश्न२: सोने तारण कर्ज किमान व कमाल किती मिळते?
किमान रु.२०००० ते कमाल रु.१.५ कोटी पर्यंत सोने तारण कर्ज मिळू शकते. कमाल मर्यादा बँक अथवा सोने तारण कर्ज देणाऱ्या एनबीएफसीच्या धोरणानुसार कमी अधिक असू शकते . सर्व साधारणपणे सरकारी बँका रु.२०००० ते २५ लाखा पर्यंत सोने अत्र्ण कर्ज देऊ शकतात व त्यांचा व्याजाचा दर ७ ते ९% च्या द्र्माय्न असतो व कर्जाचा कालवधी ३ महिने ते ३६ महिने इतका असतो.मात्र कर्ज रक्कम, व्याज दर व कालावधी या बाबत नेमके सांगता येत नाही ते सबंधित बँकेच्या धोरणावर अवलंबून असते. एनबीएफसीच्या सोने तारणाचा व्याज दर बँकांच्या व्याज दरच्या तुलनेने जास्त असतो (१२ ते ११६%) शिवाय ते कर्जही जास्त देऊ शकतात.

हर्षल राईलकर, प्रश्न३: सोने तारण व एलटीव्ही यांचा काय सबंध असतो?
एलटीव्ही म्हणजे लोन टू व्हॅल्यू रेशो , यानुसार आपण तारण ठेवत असललेल्या सोन्याच्या तारणा समोर आपल्याला कर्ज मिळते. सर्व साधारणपणे बँका सोन्याच्या बाजार भावच्या ७५% इतके कर्ज देऊ करतात मात्र आता रिझर्व्ह बँकने ९०% पर्यंत कर्ज देण्यास अनुमती दिलेली आहे.असे असले तरी सोन्य्च्या बाजार भावात चढ उतार होत असतात त्यामुळे ९०% इतके कर्ज देणे बँकेच्या /एनबीएफसीच्या दृष्टीने जास्त जोखमीचे असते. त्यामुळे जेव्हा बाजार भावाच्या किमतीच्या ७५% पेक्षा जेंव्हा जास्त कर्ज दिले जाते तेव्हा व्याज दर जास्त आकारला जातो.

संजय डोईफोडे, प्रश्न४: सोने तारण कर्ज घेण्याचे फायदे काय असतात?
इतर प्रकारच्या कर्जांपेक्षा गोल्ड लोन मिळणे सोपे आहे. गोल्ड लोनचे व्याजदर सामान्यतः इतर प्रकारच्या कर्जांपेक्षा कमी असतात. तुमचा क्रेडिट स्कोर चांगला नसला तरी नसली तरीही तुम्हाला कर्ज मिळू शकते. गोल्ड लोन घेऊन मिळणारी रक्कम आपण कोणत्याही कारणासाठी वापरू शकता .कर्ज रकम अमुक एका कारणासाठीच वापरली पाहिजे असे बंधन नसते. गोल्ड लोन सामान्यत: अल्पकालीन गरजांसाठी असतात, त्यामुळे तुम्हाला दीर्घकालीन कर्जाची चिंता करण्याची गरज नाही. आपली आर्थिक कागद पत्र (ताळेबंद, पगारची स्लीप यासारखी) द्यावी लागत नाहीत तसेच जमीनही द्यावा लागत नाही.
कर्ज अगदी अल्प कालावधीत (काहीतासात) मिळू शकते त्यामुळे आत्यंतिक गरजेच्यावेळी तातडीने कर्ज मिळत असल्याने आलेल्या प्रसंगावर मत अकर्ता येऊ शकते.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold security loan is available in how many types mmdc psp